esakal | कपिल शर्माने 'या' कारणासाठी केलं 11 किलो वजन कमी, 'बिहाईंड द सीन्स' व्हिडिओमधून झाला खुलासा
sakal

बोलून बातमी शोधा

kapil sharma

काही महिन्यांपूर्वी त्याच्या वाढलेल्या वजनाची खूप चर्चा झाली. मात्र याउलट आता त्याच्या फिटनेसची चर्चा होताना पाहायला मिळतेय.

कपिल शर्माने 'या' कारणासाठी केलं 11 किलो वजन कमी, 'बिहाईंड द सीन्स' व्हिडिओमधून झाला खुलासा

sakal_logo
By
दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई-  छोट्या पडद्यावरील सगळ्यात प्रसिद्ध कॉमेडी शो द कपिल शर्मा शो होस्ट करणारा कॉमेडियन कपिल शर्मा अनेकदा या ना त्या कारणामुळ चर्चेत असतो. काही महिन्यांपूर्वी त्याच्या वाढलेल्या वजनाची खूप चर्चा झाली. मात्र याउलट आता त्याच्या फिटनेसची चर्चा होताना पाहायला मिळतेय. नुकताच एका व्हिडिओमधून खुलासा झाला आहे की कपिल शर्माने चक्क ११ किलो वजन कमी केलं आहे. 

हे ही वाचा: अभिनेत्री तापसी पन्नूला हेल्मेट न घालता बाईक चालवणं पडलं महागात

कपिल शर्मा त्याच्या अफलातून विनोदबुद्धीने प्रेक्षकांना खळखळून हसवतो. त्याचा सेन्स ऑफ ह्युमर अनेकांना चक्रावुन टाकणारा आहे. मिडिया रिपोर्ट्सनुसार, कपिल शर्मा गेल्या अनेक दिवसांपासून वर्कआऊट करत आहे. ज्याचा रिझल्ट आता सगळ्यांसमोर आहे. असं म्हटलं जातंय की कित्येक बॉलीवूड सेलिब्रिटींनी यासाठी त्याची स्तुती देखील केली आहे.

सगळ्यांना हसवणारा कॉमेडियन कपिल शर्मा आता वेब विश्वात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. कपिलने याबाबतची अद्याप अधिकृत घोषणा केली नसली तरी अक्षय कुमारने मागील एपिसोडमध्ये कपिलच्या वेब सीरिजबाबत माहिती दिली होती. या सीरिजसाठी कपिल जोरदार तयारी करत असून त्यासाठी त्याने ११ किलो वजन कमी केलं आहे. यासंदर्भातला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

अभिनेता गोविंदाने ‘द कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी लावली. त्यावेळी अर्चना पुरणसिंह या बिहाईंड द सीन्स व्हिडिओ बनवत होत्या. यादरम्यान पडद्यामागे गप्पा मारत असताना कपिलने ११ किलो वजन कमी केल्याचा खुलासा केला आहे. अर्चना पुरण सिंगने हा व्हिडीओ शूट केला असून वजन कमी केल्यावरून त्या पुढे कपिलची मस्करी देखील करतात. कपिलने ९२ किलो वजनावरुन त्याचं वजन आता ८१ पर्यंत आणलं असल्याचा खुलासा केला आहे. यावेळी हे वजन त्याने एक वेबसिरीजसाठी कमी केल्याचं म्हटलं आहे.

कपिलने स्वतः वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याचं यावेळी सांगितलं आहे. सिनेमांमध्ये काम केल्यानंतर आता कपिल डिजीटल विश्वात त्याचं नशीब आजमावून पाहत आहे. आता ही सीरिज कोणती आहे आणि त्यात कपिलसोबत कोणते कलाकार झळकतील, तो कोणत्या भूमिकेत आहे ज्यासाठी त्याला हे ट्रान्सफॉर्मेशन करावं लागलं हे मात्र अजुन सिक्रेटंच आहे.   

kapil sharma has lost about 11 kgs of weight reveals archana puran singhs video  

loading image
go to top