esakal | अभिनेत्री तापसी पन्नूला हेल्मेट न घालता बाईक चालवणं पडलं महागात
sakal

बोलून बातमी शोधा

tapsee

अभिनेत्री तापसी पन्नूने इंस्टाग्रमवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोसोबत तिने एक कॅप्शन दिलं आहे. हे कॅप्शनंच सगळ्यांच लक्ष वेधून घेत आहे.

अभिनेत्री तापसी पन्नूला हेल्मेट न घालता बाईक चालवणं पडलं महागात

sakal_logo
By
दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई-  अभिनेत्री तापसी पन्नू लवकरच ‘रश्मी रॉकेट’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या दोन महिन्यांपासून तापसी या सिनेमातील भूमिकेसाठी मेहनत करतेय. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान असं काही घडलंय की ज्यामुळे ती थेट दंडासाठी पात्र ठरलीये. याबाबत स्वतः तिने सोशल मिडियावरुन माहिती दिली आहे.  

हे ही वाचा: सिद्धार्थ-मितालीने लग्नाआधीच साजरा केला ‘पाडवा’, फोटो शेअर करत मिताली म्हणाली..  

अभिनेत्री तापसी पन्नूने इंस्टाग्रमवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोसोबत तिने एक कॅप्शन दिलं आहे. हे कॅप्शनंच सगळ्यांच लक्ष वेधून घेत आहे. तापसीने बाईक चालवतानाचा पाठमोरा एक फोटो पोस्ट केला आहे. यावर तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय, ''विना हेल्मेटसाठी दंड भरण्याआधीचा फोटो.''  या कॅप्शनमधून कळतंय की तापसीने बाईक चालवताना हेल्मेट न घातल्याने तिला दंड भरावा लागला आहे.तापसी सध्या आकाश खुराना दिग्दर्शित ‘रश्मी रॉकेट’ या सिनेमात एका धावपटूची भूमिका साकारतेय. या शूटिंगदरम्यानचे फोटो तापसी अनेकदा सोशल मीडियावर शेअर करत असते.

तापसीसोबत या सेटवर पाच आहारतज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट, ट्रॅक ट्रेनर, ऍथलेटिक्स कोच आणि जिम ट्रेनर अशी टीम असते.  जिद्दीच्या आणि मेहनतीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचणाऱ्या एका धावपटूची भूमिका तापसी साकारतेय. तापसीने नुकतंंच तिच्या आगामी आनंद एल राय दिग्दर्शित ‘हसीन दिलरुबा’ या सिनेमाचं शूट पूर्ण केलं. यासोबतंच तिच्या हातात ‘लूप लपेटा’, ‘रन लोला रन’ हे सिनेमे देखील आहेत.  

taapsee pannu fined for not wearing helmet while riding bike for rashmi rocket shoot