कपिल शर्माच्या लेकीचे फोटो व्हायरल, वाचा काय आहे तिचं नाव

वृत्तसंस्था
Wednesday, 15 January 2020

कपिल शर्मा आणि त्याची पत्नी गिनी चतरथ यांनी एक गोंडस मुलीला जन्म दिला आहे. कपिलने त्याच्या लहानग्या परिचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

मुंबई : कपिल शर्मा हे नाव आता देशभरात पोहोलचं आहे. कपिलच्या कॉमेडी शोमुळे त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली. आपल्या भन्नाट विनोदांनी सर्वांना पोट धरुन हसविणाऱ्या या प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या घरी आज नवा पाहुणा आला आहे. कपिल शर्मा आणि त्याची पत्नी गिनी चतरथ यांनी एक गोंडस मुलीला जन्म दिला आहे. कपिलने त्याच्या लहानग्या परिचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

'चिंधी ब्रॅंडची जाहिरात न करता कंगणाने घेतली इमारत' बहिण रंगोलीचं सणसणाती ट्विट

कपिलने त्याच्या मुलीचा पहिला फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. ट्विटवर हा फोटो शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'भेटा आमच्या काळजाच्या तुकड्याला...अनायरा शर्मा'. कपिल आणि गिनी यांनी त्यांच्या मुलीचं नाव 'अनायरा' असं ठेवलं आहे. आपल्या गोंडल मुलीचा फोटो कपिलने चाहत्यांसोबत शेअर केला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#celebrations #love #blessings #akashshlokawedding @ginnichatrath

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma) on

अवघ्य़ा काही तासांतच या फोटोवर चाहत्यांनी कमेंट आणि लाइक्सचा वर्षाव केलाय. नेटकऱ्यांनी या कपलला कमेंटमधून अनेक शुभेच्छा दिल्या आहेत. कपिलने त्याच्या लाडक्या मुलीसाठी आणि पत्नीसोबत वेळ घालवण्यासाठी 15 दिवसांची सुट्टी घेतली होती. त्याच्या शोचं शुटिंग त्याने आधीच करुन घेतले. 

एक नंबर! काळ्या साडीत खुललंय या तारकांचं सौंदर्य!!

कपिलने त्याची लव्हलाइफ नेहमीच सिक्रेट ठेवली. त्यानंतर 2017 मध्ये गिनीसोबत फोटो शेअर करत रिलेशनशिपचा खुलासा त्याने केला. गेल्या वर्षी 12 डिसेंबर 2018 ला ते दोघं लग्नबंधनात अडकले.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma) on


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kapil sharma shared photo with her newly born baby girl