
लॉकडाऊनच्या दरम्यान ‘द कपिल शर्मा शो’चे शूटींग बंद होते. यानंतर 1 आॅगस्ट 2020 पासून शूटींग सुरु झाल्यानंतर शोचे नवे एपिसोड प्रेक्षकांना पाहायला मिळाले होते.
मुंबई - प्रेक्षकांचे अखंडपणे मनोरंजन करणारा शो म्हणून द कपिल शर्मा चा उल्लेख करावा लागेल. गेल्या अनेक वर्षांपासुन या शो नं प्रेक्षकांना मनमुराद हसवलं आहे. सध्या लोकप्रियतेच्या बाबत हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या सर्वाधिक आवडीचा आहे. प्रसिध्दीच्या शिखरावर असताना हा कार्यक्रम होस्ट करणारा कपिल शर्मा यानं हा कार्यक्रम सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे कारणही त्यानं सोशल मीडियावर सांगितले आहे.
द कपिल शर्मा शो चे केवळ भारतातच नाही तर जगभर त्याचे चाहते पसरले आहेत. हा शो आता बंद होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. अर्थात त्याला त्या मालिकेच्या निर्मांत्यांकडून कुठलाही अधिकृत दुजोरा मिळालेला नसला तरी सोशल मीडियाव्दारे मिळालेल्या माहितीतून शो बंद होणार असल्याचे कळल्यावर प्रेक्षकांनी कपिलला थेट प्रश्न विचारला आहे. टेलिचक्करनं ही माहिती दिली आहे. आता कार्यक्रमाचे स्वरुप बदलणार आहे. त्यामुळे तो नव्या ढंगात आणि रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे.
लॉकडाऊनच्या दरम्यान ‘द कपिल शर्मा शो’चे शूटींग बंद होते. यानंतर 1 आॅगस्ट 2020 पासून शूटींग सुरु झाल्यानंतर शोचे नवे एपिसोड प्रेक्षकांना पाहायला मिळाले होते.कोरोनाचा वाढणारा प्रादुर्भाव लक्षात घेता शोमध्ये प्रेक्षकांना येण्यास मनाई आहे. आता कपिल शर्मा आपल्या शो ला नव्या रूपात आणण्यासाठी तयार झाला आहे. प्रेक्षकच नसल्यामुळे कार्यक्रम करण्यास अडचणी येत आहेत. तसेच आपआपल्या चित्रपटांचे प्रमोशन करण्यासाठी कलाकार य़ेत होते ते ही आता कोरोनामुळे येईनासे झाल्यानं प्रेक्षकांची संख्या घटण्यास सुरुवात झाली आहे. यापूर्वी स्टूडिओमध्ये असणा-या प्रेक्षकांमुळे निर्माण होणा-या वातावरण निर्मितीमुळे कार्यक्रमाची रंगत वाढायची. मात्र आता ते होत नसल्यानं कार्यक्रम काही अंशी रटाळ वाटायला लागल्याच्या प्रतिक्रिया प्रेक्षकांडून यायला लागल्या आहेत.
'गळाभेट घेऊन घ्या रामाचं नाव, गळा दाबून नाही'
कार्यक्रमाचे निर्माते यांनी आता काही बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा प्रभाव मनोरंजन क्षेत्रावर जाणवत असल्यानं त्याचा परिणाम कार्यक्रमावर झाला आहे. सध्या प्रेक्षक कार्यक्रमाला येत असल्याची माहिती अर्चना पुरन सिंहने दिली होती. तर 50 टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत कार्यक्रम करण्याची परवानगी प्रशासनानं दिली आहे. दुसरीकडे असेही सांगितले जात आहे की, कपिलची पत्नी गिन्नी चतरथ प्रेग्नंट आहे. त्यामुळे कपिलनं काही काळ सुट्टी घेतली आहे. दरम्यान तीन महिन्याच्या काळात एका नव्या अंदाजात कपिल शर्मा प्रेक्षकांचे मनोरंजन करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.