'गळाभेट घेऊन घ्या रामाचं नाव, गळा दाबून नाही'

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 24 January 2021

अभिनेत्री आणि टीएमसीची खासदार नुसरत जहॉ हिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट केली आहे. सध्याच्या परिस्थितीवर तिनं भाष्य केलं आहे.

मुंबई - अभिनेत्री आणि मॉडेल नुसरत जहॉ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिनं एक राजकीय विधान करुन एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय वातावरण एका वेगळ्या दिशेला जात असल्याचे दिसून आले आहे. वादग्रस्त मालिका, त्यात दाखविण्यात आलेला आशय यामुळे समाजमन ढवळून निघाले आहे.

जय श्री राम च्या नावानंही सोशल मीडियावर वाद होताना पाहायला मिळत आहे. त्यावर अभिनेत्री आणि टीएमसीची खासदार नुसरत जहॉ हिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट केली आहे. सध्याच्या परिस्थितीवर तिनं भाष्य केलं आहे. तसेच परखड शब्दांत विरोधकांना फटकारले आहे. पश्चिम बंगालच्या राजधानीत म्हणजे कोलकातामध्ये एका सरकारी कार्यक्रमात जय श्री रामच्या नावानं घोषणाबाजी सुरु झाली. तेव्हापासून तिथे वेगळे वातावरण पाहायला मिळत आहे. राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विशेष म्हणजे त्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी होत्या. त्यांनीही याप्रसंगावर नाराजी व्यक्त केली आहे. व्टिटरवर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

यासगळ्याचे निमित्त म्हणजे आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 125 वी जयंती आहे. ती साजरी करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात जय श्री राम अशी घोषणाबाजी करण्यात आली होती. त्यावेळी कार्यक्रमात मोठा गदारोळ झाला. बंगालच्या राजकीय गोटात चिंतेचे वातावरण तयार झाले. यासगळ्या परिस्थितीवर खासदार नुसरत जहाने एक व्टिट केले आहे. तिनं असे म्हटले आहे की, रामाचे नाव हे गळाभेट घेऊन घ्या. गळा दाबून नव्हे. ज्या पध्दतीनं नेताजी यांच्या 125 व्या जयंतीच्या कार्यक्रमात जय श्री राम यांच्या नावानं घोषणाबाजी करण्यात आली त्याचा मी निषेध करते. असे तिनं म्हटलं आहे.

 नताशा होणार वरुण की दुल्हनिया; 24 जानेवारीला अडकरणार लग्नाच्या बेडीत

कोलकात्तामधील व्हिक्टोरिया मेमोरियल हॉलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित होत्या. ज्यावेळी ममता बॅनर्जी या भाषणासाठी स्टेजवर गेल्या त्याचवेळी प्रेक्षकांमध्ये बसलेल्या काही व्यक्तींनी जय श्री राम च्या नावानं घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली होती. याप्रसंगी ममता यांनी नाराजी व्यक्त करुन भाषण देण्यास नकार दिला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: politician Nusrat jahan speaks on jay sri ram incident tweet viral social media