esakal | व्हिलचेअरवर बसलेला कपिल शर्मा फोटोग्राफर्सवर भडकला; म्हणाला..
sakal

बोलून बातमी शोधा

kapil sharma

एअरपोर्टमधून व्हिलचेअरवर निघालेल्या कपिल शर्माला पाहून फोटोग्राफर्सनी केली आरोग्याची चौकशी

व्हिलचेअरवर बसलेला कपिल शर्मा फोटोग्राफर्सवर भडकला; म्हणाला..

sakal_logo
By
स्वाती वेमूल

कॉमेडियन व अभिनेता कपिल शर्मा नेहमीच प्रेक्षकांच्या त्याच्या विनोदबुद्धीने खळखळून हसवत असतो. मात्र नुकताच त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय, ज्यामध्ये तो फोटोग्राफर्सना ओरडताना दिसतोय. कपिल शर्माला नेमकं काय झालंय, याची चिंता चाहत्यांना सतावत असताना त्याच्या चिडलेल्या स्वभावावरूनही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कपिलला विमानतळावर व्हिलचेअरवर जाताना फोटोग्राफर्सनी पाहिलं. त्यावेळी त्याचे फोटो, व्हिडीओ काढत असताना त्यांनी त्याच्या तब्येतीचीही विचारपूस केली. मात्र कपिल त्यांच्यावरच भडकला. 

"ओय, तुम्ही सर्वजण बाजूला व्हा. तुम्ही गैरवर्तणूक करता", असं कपिल फोटोग्राफर्सना म्हणतो. इतकंच नव्हे तर नंतर कपिलच्या टीममधील एक व्यक्ती फोटोग्राफर्सना काढलेले फोटो व व्हिडीओ डिलिट करण्याची विनंती करतो. "तो आम्हाला मूर्ख म्हणाला, आम्ही फोटो, व्हिडीओ डिलिट करणार नाही", अशी भूमिका एक फोटोग्राफर घेताना दिसतो. एरव्ही आपल्या विनोदबुद्धीमुळे ओळखला जाणारा कपिल आता अचानक असा का वागू लागला, हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. कपिलचे व्हिलचेअरवरील फोटो व्हायरल होताच, चाहत्यांची त्याच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. 

हेही वाचा : अध्ययनच्या आत्महत्येच्या खोट्या वृत्तावर शेखर सुमनचा संताप; मोदींकडे केली तक्रार

याच महिन्यात कपिल शर्माची पत्नी गिन्नी छत्रथने मुलाला जन्म दिला. या दोघांना आधी एक मुलगी असून अनायरा असं तिचं नाव आहे. कपिल शर्माचा कॉमेडी शो लवकरच बंद होणार असल्याचं त्याने गेल्या महिन्यात स्पष्ट केलं होतं. मुलाबाळांना व पत्नीला वेळ देण्यासाठी थोडा ब्रेक घेणार असल्याचं कारण त्याने सांगितलं होतं.