esakal | पार्टीला जायचचं, काठी घेऊन निघाले रणधीर कपूर

बोलून बातमी शोधा

Kapoor step out attend babita birthday party troll
पार्टीला जायचचं, काठी घेऊन निघाले रणधीर कपूर
sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने महाराष्ट्र सरकार नागरिकांना घरी राहण्याची विनंती करत आहे. महाराष्ट्रात सध्या ‘ब्रेक द चेन मोहिम’ राबवण्यात येत आहे. मुंबईमध्ये संचार बंदी लागू करण्यात आली आहे. अशा वेळी सर्व नागरिक घरात बसलेले असताना सेलिब्रेटी मात्र बाहेर फिरताना दिसत आहेत.

नुकताच करिना आणि करिष्मा कपूरची आई ज्येष्ठ अभिनेत्री बबिता कपूर यांचा वाढदिवस मुंबईमध्ये करिनाच्या घऱी साजरा करण्यात आला. यावेळी करिना आणि करिष्माने छोट्या पार्टीचे आयोजन केले होते.करिष्मा कपूरने या पार्टीला तिच्या मुलांसोबत हजेरी लावली. तसेच सोहा आली खान देखील पती कुणाल खेमू सोबत पार्टीला आली. सर्व जण आल्यानंतर सर्वात शेवटी रणधीर कपूर आले यावेळी रणधीर काठीचा आणि नर्सचा आधीर घेत चालत होते. त्यांची ही अवस्था पाहून अनेक जणांनी काळजी व्याक्त केली. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायर होत आहे. मुंबईत संचारबंदी असूनही हे सेलिब्रिटी बाहेर पार्टीसाठी कसे पडू शकतात असा सवाल नेटकऱ्यांनी केला आहे. यामुळे करिना आणि करिष्माला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. एका नेटकऱ्याने या व्हिडीओवर कमेंट केली,‘ देशात महामारी चालू आहे. तसेच मुंबईमध्ये संचारबंदी असूनही हे सेलिब्रेटी पार्टी कशी काय करू शकतात?’

कपूर घराण्यातील रणबीर कपूरला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर काही दिवसांनी त्याला आलिया भटसोबत मालदिवला जाताना एरपोर्टवर पत्रकारांनी पाहिले. तेव्हा रणबीरला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते आता बबिता कपूर यांच्या बर्थ डे पार्टीमुळे कपूर कुटुंबाला पुन्हा एकदा ट्रोलर्सचा सामना करावा लागला.