करण जोहर, दीपिका, विकी कौशल आणि इतर सेलिब्रिटींविरोधात NCB करणार तपास, ड्रग पार्टीप्रकरणी सिरसा यांच्या तक्रारीनंतर मोठी कारवाई

sisra on bollywood drug party
sisra on bollywood drug party

मुंबई- शिरोमणी अकाली दल (SAD) चे विधानसभा आमदार मनजिंदर सिंह सिरसा यांच्या तक्रारीवर कारवाई करत नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो(NCB) मुख्यालयाने मुंबईच्या एनसीबीला बॉलीवूडच्या काही बड्या लोकांविरोधात तपास करण्याचे आदेश दिले आहेत. सिरसा यांनी करण जोहर, दीपिका पदूकोण, विक्की कौशल सोबत इतर काही सेलिब्रिटींविरोधात कथित 'ड्रग पार्टी' केल्याचा आरोप केला होता.

सिरसा यांनी मंगळवारी BSF मुख्यालयमध्ये नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोचे प्रमुख राकेश अस्थाना यांची भेट घेतली. त्यांनी करण जोहर, दीपिका पदूकोण, मलाईका अरोरा, अर्जुन कपूर, शाहिद कपूर, मीरा राजपूत कपूर,नताशा दलाल, जोया अख्तर, मिलिंद देवरा यांची पत्नी पूजा शेट्टी देवरा, अयान मुखर्जी, रणबीर कपूर, वरुण धवन, विक्की कौशल आणि इतरांविरुद्ध NDPS अधिनियम १९८५ अन्वये तक्रार दाखल केली आहे. त्यांच्यावर २०१९ मध्ये कथित ड्रग पार्टीचं आयोजन केल्याचा आरोप लावला आहे.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग कनेक्शन समोर आल्यानंतर बॉलीवूडमध्ये ड्रग्सचा वापर होत असल्याच्या मुद्द्याने जोर पकडला होता तसंत अभिनेत्री कंगना रनौतने देखील दावा केला होता की इंडस्ट्रीतील ९९ टक्के सेलिब्रिटी ड्रग्सचं सेवन करतात. आता एनसीबीचं मुंबई पथक सिरसा यांच्या तक्रारीचा देखील तपास करणार आहेत. 

सिरसा यांनी त्यांच्या तक्रारीनंतर कारवाई न केल्याने मुंबई पोलिसांवर देखील निशाणा साधला. ते म्हणाले, 'मी एक वर्षापूर्वी म्हणजेच २०१९ मध्ये या ड्रग पार्टी विरोधात तेव्हाच्या मुंबई कमिशनरकडे तक्रार केली होती.  जर वेळी कारवाई केली गेली असती तर आज सुशांतला देखील वाचवता आलं असतं. मुंबई पोलिसांनी तपास केला नाही. उलट त्यांनी काही बड्या लोकांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न केला. मात्र आता सुनामी आली तरी तपास होईल. मोठी नावं समोर येतील, राजकारणातील देखील. मोठा मासा आता गळाला लागणार आहे कारण एनसीबी मुख्यालयाने आता मुंबई युनिटला पाठवलं आहे.'  

इथे पाहा करण जोहरच्या पार्टीचा व्हायरल व्हिडिओ-

karan johar deepika vicky and others named as ncb takes up sirsas bollywood drugs complaint  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com