करण जोहरने दिलं स्पष्टीकरण, 'पार्टीमध्ये ड्रग्सचं सेवन केल्याच्या बातम्या खोट्या' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

karan johar

करणच्या हाऊस पार्टीमध्ये ड्रग्सचा वापर केल्याचा दावा काही जणांनी केला होता. तसंच धर्मा प्रोडक्शनच्या दोन दिग्दर्शकांची एनसीबी चौकशी करणार असल्याचं म्हटलं जात होतं. यावर आता करण जोहरने पुढे येत स्पष्टीकरण दिलं आहे. 

करण जोहरने दिलं स्पष्टीकरण, 'पार्टीमध्ये ड्रग्सचं सेवन केल्याच्या बातम्या खोट्या'

मुंबई- सुशांत सिंह राजपूत प्रकरणात अनेकदा करण जोहरवर निशाणा साधला गेला आहे. काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ करण जोहरच्या घरी झालेल्या पार्टीचा असल्याचं दिसत होतं. करणने स्वतः हा व्हिडिओ शूट केलेला. यामध्ये दीपिका पदूकोण, मलाईका अरोरा, अर्जुन कपूर, वरुण धवन, विकी कौशल, शाहीद कपूर, मीरा राजपूत सोबत आणखी काही जणांचा समावेश होता. करणच्या या हाऊस पार्टीमध्ये ड्रग्सचा वापर केल्याचा दावा काही जणांनी केला होता. तसंच धर्मा प्रोडक्शनच्या दोन दिग्दर्शकांची एनसीबी चौकशी करणार असल्याचं म्हटलं जात होतं. यावर आता करण जोहरने पुढे येत स्पष्टीकरण दिलं आहे. 

हे ही वाचा: रकुलप्रीत सिंहने रिया चक्रवर्तीवर फोडलं खापर, ड्रग्स सेवनाला दिला नकार  

करण जोहरने त्याच्या सोशल अकाऊंटवरुन एक नोट सादर केली आहे. ज्यामध्ये त्याने त्याच्यावर असलेल्या सगळ्या आरोपांचं खंडन केलं आहे. करणने म्हटलंय, 'मिडियामध्ये चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत की पार्टीमध्ये ड्रग्सचं सेवन केलं गेलं होतं. मी २०१९ मध्येच याबाबत स्पष्टीकरण देत याचं खंडन केलं होतं. सध्या दुर्दैवाने पुन्हा एक कॅम्पेन चालवलं जात आहे. हे आरोप पूर्णपणे निराधार आहेत. त्या पार्टीत कोणत्याही ड्रग्सचं सेवन केलं गेलं नव्हतं. अशा अपशब्दांच्या वापरामुळे आणि वाईट बातम्यांमुळे, लेखांमुळे मला, माझ्या कुटुंबाला, माझ्या सहका-यांना आणि धर्मा प्रोडक्शनला विनाकारण टिकेस पात्र बनवलं आहे.'

तसंच करणने पुढे म्हटलंय की, 'मिडियामध्ये असं सांगितलं जात आहे की क्षितीज प्रसाद, अनुभव चोप्रा माझे सहकारी आहेत. मी सांगू इच्छितो की मी यांना वैयक्तिकरिच्या ओळखत नाही. दोघेही धर्मा प्रोडक्शनचे जवळचे सहकारी नाहीत. ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काय करत असतील त्याच्यासाठी मी आणि धर्मा प्रोडक्शन जबाबदार नाही. अनुभव चोप्रा नोव्हेंबर २०११ आणि जानेवारी २०१२ च्या दरम्यान दोन महिन्यांसाठी एका सिनेमासाठी दुसरे सहाय्यक दिग्दर्शक होते आणि जानेवारी २०१३ मध्ये शॉर्ट फिल्मसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलेलं. त्यानंतर ते आमच्याशी जोडले गेले नाहीत. तसंच क्षितीज रवी प्रसाद २०१९ मध्ये एका प्रोजेक्टसाठी कार्यकारी निर्माताच्या पोस्टवर होते तेही धर्माटिक एंटरटेन्मेंटसाठी. मात्र तो प्रोजेक्ट होऊ शकला नाही.'

'गेल्या काही दिवसांपासून मिडियाध्ये चूकीच्या आणि खोट्या आरोपांचा आधार घेतला आहे. मला आशा आहे की मिडियाचे सदस्य संयम ठेवतील अन्यथा माझ्याकडे या आधारहिन हल्ल्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यावाचून दुसरा पर्याय नसेल.'      

karan johar gave clarification in statement about narcotics were consumed at a party

loading image
go to top