रकुलप्रीत सिंहने रिया चक्रवर्तीवरंच फोडलं खापर, ड्रग्स सेवन प्रकरणी दिला नकार

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Friday, 25 September 2020

रकुलप्रीत आणि रिया चक्रवर्ती यांच्यामध्ये ड्रगसंबंधी व्हॉट्सअप चॅट समोर आलं होतं. सुत्रांच्या माहितीनुसार रकुलने रियासोबतचं हे व्हॉट्सअप चॅट कबुल करत रियावरंच खापर फोडलं आहे.

मुंबई- बॉलीवूड ड्रग कनेक्शनमध्ये बॉलीवूडच्या ४ टॉप अभिनेत्रींना समन्स बजावण्यात आले आहेत. यापैकी अभिनेत्री रकुलप्रीत सिंहची आज एनसीबीकडून चौकशी केली गेली. तर श्रद्धा कपूर, दीपिका पदूकोण आणि सारा अली खान यांची उद्या शनिवारी चौकशी केली जाणार आहे. एनसीबीला रकुलप्रीत सिंह विरोधात पुरावे मिळाले असल्याचं म्हटलं जात होतं. रकुलप्रीत आणि रिया चक्रवर्ती यांच्यामध्ये ड्रगसंबंधी व्हॉट्सअप चॅट समोर आलं होतं. सुत्रांच्या माहितीनुसार रकुलने रियासोबतचं हे व्हॉट्सअप चॅट कबुल करत रियावरंच खापर फोडलं आहे.

हे ही वाचा: बॉलीवूडमध्ये मराठमोळ्या नावाचा अनेकांनी घेतलाय धसका, एनसीबीचा हा अधिकारी आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा पती  

रकुलने रियासोबतचं २०१८ मधील ड्रग चॅटची कबुली दिली आहे. रकुलने एनसीबीला सांगितलं की रिया या चॅटमध्ये तिचं सामान (वीड) मागवत होती. रियाचं सामान (वीड) तिच्या घरातंच होतं. रकुलने असं स्पष्टीकरण दिलं असलं तरी तिच्या बोलण्यात कितपत सत्य आहे याचा तपास एनसीबी करणार आहे. रकुलप्रीतचा तपास सुरुच राहणार आहे. रिया चक्रवर्तीने एनसीबीच्या चौकशीत रकुलप्रीत सिंहचं नाव घेतल्याची चर्चा आहे.

असं म्हटलं जातंय की रियानेच रकुल ड्रग्स घेत असल्याचा खुलासा केला. रकुल आणि रिया दोघी चांगल्या मैत्रीणी आहेत. मात्र आता जेव्हा दोघीही अडचणीत सापडल्या आहेत तेव्हा ब्लेम गेम सुरु झालेला दिसून येतोय. रिया ड्रग्स प्रकरणात मुंबईच्या भायखळा येथील जेलमध्ये आहे. कोर्टाकडून तिला जामीनही मंजूर होत नाहीये. 

रकुलप्रीत सिंह गुरुवारी हैद्राबादमध्ये तिच्या सिनेमाचं शूटींग सोडून मुंबईत आली. रकुल हिंदी आणि साऊथ सिनेमात कार्यरत आहे. रकुलनंतर आता  शनिवारी एनसीबी दीपिका पदूकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांची चौकशी करणार आहे.   

rakul preet singh admits drug chat with rhea chakraborty deny from taking drug big revealation  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rakul preet singh admits drug chat with rhea chakraborty deny from taking drug big revealation