esakal | ड्रग्स प्रकरणामुळे करण जोहरच्या अडचणींमध्ये होणार वाढ, 'त्या' पार्टीच्या तपासाची होतेय मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

karan johar house party

गेल्या वर्षी व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून असं म्हटलं गेलं की या पार्टीमध्ये बॉलीवूड सेलेब्स ड्रग्स पार्टी करत आहेत आणि सगळे नशेत देखील आहेत. 

ड्रग्स प्रकरणामुळे करण जोहरच्या अडचणींमध्ये होणार वाढ, 'त्या' पार्टीच्या तपासाची होतेय मागणी

sakal_logo
By
दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- गेल्या वर्षी जुलै महिन्यामध्ये सोशल मिडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ करण जोहरच्या हाऊस पार्टीचा होता. या पार्टीमध्ये दीपिका पदूकोण, अर्जुन कपूर, मलाईका अरोरा, शाहिद कपूर, वरुण धवन अयान मुखर्जी, रणबीर कपूरसोबत अनेक लोक दिसून आले होते. या व्हिडिओ स्वतः करण जोहरने काढला होता. गेल्या वर्षी व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून असं म्हटलं गेलं की या पार्टीमध्ये बॉलीवूड सेलेब्स ड्रग्स पार्टी करत आहेत आणि सगळे नशेत देखील आहेत. 

हे ही वाचा: कंगना रनौतची मुक्ताफळं, उर्मिला मातोंडकरला म्हणाली 'सॉफ्ट पॉर्न स्टार'

व्हायरल झालेल्या या व्हिडिओनंतर उफाळलेल्या वादामुळे करण जोहरला स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. तो म्हणाला होता 'जर या पार्टीमध्ये ड्रग्सचा वापर केला गेला असता तर त्याने स्वतः हा व्हिडिओ का काढला असता?' काही दिवस या व्हिडिओवर चर्चा झाली आणि याच्या तपासाची मागणी जोर धरु लागली होती. मात्र नंतर सगळेजण विसरुन गेले. आता सुशांत सिंह राजपूत केसमध्ये ड्रग प्रकरणात रिया चक्रवर्तीला अटक झाल्यानंतर तिने केलेल्या काही खुलास्यांमधून बॉलीववूडमध्ये ड्रग्सचा वापर आणि तस्करी करण्यावरुन आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 

ड्रग्स प्रकरणात सारा अली खान, रकुल प्रीत सिंह, सिमोन खंबाटा यांच्या नावांची चर्चा होती. मात्र एनसीबीने यावरही स्पष्टीकरण दिलं होतं की त्यांनी अशी कोणतीही लिस्ट तयार केलेली नाही. मात्र तरीही संसदेत यावरुन गदारोळ सुरु आहे. आता शिरोमणी अकाली दलचे नेते मंजिंदर सिंह सिरसा आणि महाराष्ट्रातील अमरावतीतील अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी करण जोहरच्या या पार्टीचा तपास करण्याची मागणी केली आहे. नवनीत स्वतः देखील अभिनेत्री होत्या. त्यांनी तेलुगु सिनेइंडस्ट्रीमध्ये काम केलं आहे.   

karan johar house party manjinder singh sirsa mp navneet rana asked for the investigation in drug matters  

loading image