Karan Johar: 'कितीही आरोप करा, मी मात्र..', करण जोहरनं पोस्ट करत उडवली खळबळ

अनुष्का शर्माचं करिअर उद्ध्व्स्त करण्याचा करण जोहरचा इरादा होता हे समोर आणणारा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्याविरोधात वातावरण चांगलंच पेटलं होतं.
Karan Johar cryptic Post
Karan Johar cryptic PostEsakal

Karan Johar: काही दिवसांपूर्वीच करण जोहर आणि अनुष्का शर्माचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता,ज्यात करण जोहर म्हणताना दिसत आहे की त्याला एकेकाळी अनुष्का शर्माचं करिअर उद्ध्वस्त करायचं होतं.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर करण जोहरला अनेक सेलिब्रिटींच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. विवेक अग्निहोत्री आणि अपूर्व असरानी करणवर चांगलेच भडकले होते. पण करणनं या प्रकरणावर गप्प राहणं योग्य समजलं.

पण आता या सगळ्या वादा दरम्यान करण जोहरनं एक क्रिप्टिक पोस्ट लिहिली आहे. जिला पाहून वाटत आहे की त्यानं समोरुन विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.

काही दिवस आधी ट्वीटरवर एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यात करण जोहर मान्य करताना दिसत आहे की त्यानं एकेकाळी अनुष्का शर्माचं करिअर बंद पाडायचा वीडा उचलला होता.

'रब ने बना दी जोडी' मध्ये जेव्हा आदित्य चोप्रानं अनुष्का शर्माला कास्ट केलं होतं तेव्हा करणनं त्याला असं करण्यासाठी नकार दिला होता. करणनं अनुष्काच्या फोटोला पाहून म्हटलं होतं की 'तू वेडा आहेस का आपल्या सिनेमात हिला कास्ट करतोयस'.

पण नंतर त्याला त्याची चूक कळाली होती. आपण असा विचार केला याबद्दल त्याला गिल्टही आलं होतं. स्वतः करणनं नंतर अनुष्काला आपल्या सिनेमात साइन केलं होतं.(Karan Johar Post on all allegations on anushka sharma to priyanka chopra)

Karan Johar cryptic Post
Swara Bhaskar Birthday: 5 वर्ष लिव्ह-इन मध्ये राहून एका क्षणात 'या' व्यक्तीसोबत स्वरानं तोडलेलं नातं..काय होतं कारण?

करण जोहरला या जुन्या व्हिडीओमुळे खूप अवहेलना सहन करावी लागली. पण आता करण जोहरनं इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यात त्याच्यावर उठवल्या गेलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली गेल्याचं बोललं जात आहे.

करणनं लिहिलं आहे,''करा..तुम्हाला जेवढे आरोप करायचेत तेवढे करा..मी झुकणाऱ्यातला नाही..खोट्याचे गुलाम बना..आम्ही बोलणाऱ्यांपैकी नाही..कितीही बदनामी करा..कितीही आरोप लावा,आम्ही हार मानणाऱ्यातले नाही..आमचं यश आमच्या कामात दडलंय,तुम्ही भले तलवारीनं वार करा..आम्ही मान टाकणार नाही..''

Karan Johar cryptic Post
Jaya Bachchan: 43 वर्षांपूर्वी असा काय वाद झाला की विवेकानंदांच्या गेटअपमधील जया बच्चनचा सिनेमा अचानक बंद पडला.. वाचा
Karan Johar cryptic Post
Karan Johar cryptic PostInstagram Story Image

अनुष्का शर्माच्या व्हायरल व्हिडीओनंतर प्रियंका चोप्राच्या बॉलीवूड विरोधातील वक्तव्यामुळेही करण जोहरला नावं ठेवली गेली होती. प्रियंका चोप्रानं ब़ॉलीवूड विषयी जे प्रश्न निर्माण केले त्यानंतर नेपोटिझमचा मुद्दा उठला होता आणि इंडस्ट्रीत कसं गळचेपी होते हे देखील समोर आलं होतं.

प्रियंका चोप्रानं कोणाचं नाव न घेता बॉलीवूडवर आरोप केले होते की इथे खूप राजकारण चालतं. तिला देखील एकटं पाडलं होतं आणि या सगळ्याला कंटाळूनच तिनं बॉलीवूडपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला होता.

प्रियंकाच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा कंगना रनौतनं प्रतिक्रिया देत करण जोहरचं नाव उगाचच मध्ये आणलं होतं.

Karan Johar cryptic Post
Hruta Durgule: लग्नानंतर प्रतिकनं हृताचं ठेवलं 'निक नेम'.. तिच्याप्रमाणेच क्यूट आहे 'हे' नाव..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com