Karan Johar: 'तू त्याचं कितीही कौतूक कर तो तुझ्या 'ब्रह्मास्त्र...' केआरकेचा करण जोहरला टोमणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Karan Johar

Karan Johar: 'तू त्याचं कितीही कौतूक कर तो तुझ्या 'ब्रह्मास्त्र...' केआरकेचा करण जोहरला टोमणा

अभिनेता आणि चित्रपट समीक्षक कमल आर. खान म्हणजेच ​​केआरके कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहतो. बॉलीवूडमधील स्टार्सपासून ते निर्माते-दिग्दर्शकांपर्यंत तो अनेकांवर टिका करत असतोय. केआरके ट्विटरवर खूप सक्रिय आहे. (Karan Johar Praised Karthik Aryan Shahzada Kamal R. khan trolled)

हेही वाचा: Evelyn Sharma: कुणी तरी येणार गं! 'ये जवानी है दिवानी' फेम अभिनेत्रीने दिली गुडन्यूज

काही दिवसांपुर्वीच त्यानं शाहरुखवरही टिका केली मात्र ते त्याला चांगलच महागात पडलं. आता त्याने पुन्हा एकादा ट्विटरवरच्या माध्यमातुन करण जोहरबाबत असं काही पोस्ट केलं की त्यामुळं तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. करण जोहरवर हल्ला करण्याची एकही संधी केआरके सोडत नाही. नुकतचं करण जोहरने कार्तिक आर्यनच्या आगामी ‘शहजादा’ या चित्रपटाचं कौतुक केलं होते.

हेही वाचा: Rakhi Sawant: राखीचा नवरा सलमानला घाबरला म्हणुन...आदिल खानबद्दल मोठा खुलासा

यावर केआरकेने ट्विट करत त्याच्यावर निशाणा साधला. त्याने ट्विटमध्ये लिहिले की, 'जेव्हा करण जोहरच्या सर्व स्टार किड्स आणि मित्रांनी त्याचा चित्रपट ब्रह्मास्त्र 2 करण्यास नकार दिला, तेव्हा त्याने कार्तिक आर्यनचं कौतुक केलं की तो त्याचा चित्रपट करण्यास तयार होईल. तर करण भावा, मी एका कागदावर लिहून देवू शकतो की कार्तिक तुझ्या फ्लॉप चित्रपट ब्रह्मास्त्रचा सिक्वेल कधीच साइन करणार नाही.'

हेही वाचा: Urfi Javed: हमसे दुर और दफा रहो... म्हणत उर्फीनं थेट इशाराच दिला..आता काही खरं नाही!

कार्तिकच्या चित्रपटाचा ट्रेलर त्याच्या इन्स्टा स्टोरीवर शेअर करताना करण जोहरने लिहिले की, 'मसाला से भरपूर और एंटरटेनमेंट का जबरदस्त तड़का'. त्यांने शहजादाच्या टीमचे अभिनंदनही केले होते. करणच्या या पोस्टवर कार्तिकचे चाहतेही आश्चर्यचकित झाले होते आणि आता केआरकेने हे ट्विट करत आगीत तेल ओतण्याचं काम केलं आहे. त्याच्या या ट्विटला कार्तिकच्या चाहत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत.