Urfi Javed: हमसे दुर और दफा रहो... म्हणत उर्फीनं थेट इशाराच दिला..आता काही खरं नाही! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Urfi Javed

Urfi Javed: हमसे दुर और दफा रहो... म्हणत उर्फीनं थेट इशाराच दिला..आता काही खरं नाही!

सध्या महाराष्ट्रात उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यात जोरदार वाद होतांना दिसत आहे. एकीकडे चित्रा वाघ या प्रेस घेत उर्फीवर निशाणा साधत आहेत तर उर्फीही ट्विट आणि व्हिडिओ शेअर करत चित्रा वाघ यांनी डिवचत आहे.

हेही वाचा: Ved Movie: "सत्या-श्रावणीच पुढं काय?" चाहते नाराज! रितेश देणार उत्तर...

त्यातच भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद विरूध्द सार्वजनिक ठिकाणी तोकडे कपडे घातल्या प्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदविली होती. सार्वजनिक ठिकाणी तोकडे कपडे घातल्या प्रकरणी मॉडेल उर्फी जावेदचा जबाब मुंबईतील आंबोली पोलिसांनी नोंदविण्याला मात्र तिनं पुन्हा एकदा तिच्या फॅशनचा अविष्कार करत व्हिडिओ शेअर केला आणि ती तिची फॅशन चालूच ठेवणार असं दाखवलं.

हेही वाचा: Urfi Javed: "अरे यार! आता देवेंद्रजीसुद्धा.. "

आता पुन्हा उर्फीनं ट्विट करत नावं न घेता चित्रा वाघ यांच्यावर निशाना साधला आहे. तिनं ट्विटमध्ये लिहिलयं,'खुश रहो या खफा रहो..हमसे दुर और दफा रहो' यावरुन आता हे स्पष्ट दिसतयं की तिनं चित्रा वाघ यांना तिच्यापासून लांब राहण्याचा इशारा दिला आहे.

हेही वाचा: Urfi Javed : उर्फी जावेद मुस्लिम असल्याने भाजपकडून टार्गेट...तृप्ती देसाई अ‍ॅक्शन मोडमध्ये

याआधीही तिने पोलिसांनी जबाब नोंदवितांना. 'मी भारताची नागरिक आहे. मला माझ्या आवडीचे कपडे घालण्याचा, बोलण्याचा, वागण्याचा अधिकार आहे. हा अधिकार मला राज्यघटनेने दिला आहे.' असं म्हटलं होतं. त्यामुळे पुन्हा तिचं हे ट्विट चर्चेत आलं आहे.