esakal | काय...? करण जोहरने संचालकपदाचा राजीनामा दिला...

बोलून बातमी शोधा

काय...? करण जोहरने संचालकपदाचा राजीनामा दिला...

सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर घराणेशाहीचा मुद्दा हंदी चित्रपटसृष्टीत चांगलाच चर्चिला गेला आहे आणि अजूनही त्याचीच चर्चा रंगलेली आहे. निर्माता व दिग्दर्शक करण जोहर, अभिनेत्री आलिया भट, सलमान खान, सोनम कपूर, अर्जुन कपूर आदी मंडळींना याबाबत टार्गेट करण्यात येत आहे.

काय...? करण जोहरने संचालकपदाचा राजीनामा दिला...
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई ः सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर घराणेशाहीचा मुद्दा हंदी चित्रपटसृष्टीत चांगलाच चर्चिला गेला आहे आणि अजूनही त्याचीच चर्चा रंगलेली आहे. निर्माता व दिग्दर्शक करण जोहर, अभिनेत्री आलिया भट, सलमान खान, सोनम कपूर, अर्जुन कपूर आदी मंडळींना याबाबत टार्गेट करण्यात येत आहे. त्यांच्या फॅन्स फाॅलोइंगमध्येही दिवसेंदिवस घट होत चाललेली आहे. विशेष करून करण जोहरवर टीकेचा भडिमार अधिक होत आहे. त्यामुळे वैतागलेल्या करण जोहरने आता मामिचा (मुंबई अकॅडमी आॅफ द मुव्हिंग इमेज) संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. मामि चित्रपट महोत्सवाच्या चेअरपर्सन दीपिका पदुकोनने  याबाबत करणची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु ते प्रयत्न सपशेल फोल ठरलेले आहेत.

मनोरंजन विश्वातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

मामि चित्रपट महोत्सव यावर्षी नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात मुंबईत पार पडणार आहे. जगातील दर्जेदार आणि उत्तमोत्तम चित्रपट पाहण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे. मामि लवकरच आपला रौप्यमहोत्सव साजरा करणार आहे. मामिच्या बोर्डावर विक्रमादित्य मोटवानी, कबीर खान, झोया अख्तर, सिद्धार्थ राॅय-कपूर, दीपिका पदुकोन ही मंडळी आहेत. करणने आपला राजीनामा फेस्टिव्हलच्या डायरेक्टर स्मृती किरण यांना मेल केला आहे. सध्या करण हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांवर भलताय नाराज आहे. कारण जेव्हा त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला तेव्हा हिंदी चित्रपटसृष्टीतील कुणीही त्याच्या मदतीसाठी पुढे आला नाही. सध्या इंडस्ट्रीत धर्मा प्राॅडक्शन हे नामांकित प्राॅडक्शन समजले जाते. परंतु करणला कुणीही सहकार्य केले नाही किंवा त्याच्या मदतीसाठी आले नाही. त्यामुळे करण भलताच नाराज झाला आहे असे समजते. आता त्याचा हा राजीनामा मंजूर होतो की नाही ते लवकरच समजेल.