'कुछ कुछ होता है' सिनेमाबद्दल करण जोहरचा मुलगा पहा काय म्हणतोय...?

संतोष भिंगार्डे
गुरुवार, 9 एप्रिल 2020

क्वारंटाईन दिवसांमध्ये करण जोहर सतत त्याच्या मुलांसोबत सोशल मिडियावर व्हिडिओ शेअर करताना दिसतो आहे. त्यांचे हे व्हिडिओ सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहेत

मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन असताना अत्यावश्यक सेवा असणारे कर्मचारीच फक्त काम करताना दिसत आहेत. सरकारबरोबरच डाॅक्टर्स, नर्सेस तसेच अन्य कर्मचारी  या संकटातून बाहेर पडण्यासाठी दिवस-रात्र प्रयत्न करत आहेत. यातच संपूर्ण चित्रपटसृष्टी थंडावली आहे. मालिका आणि चित्रपटांचे चित्रीकरण देखील बंद करण्यात आले आहे. सतत चित्रपट आणि मालिकांच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त असलेले हे कलाकार देखील घरात बसले आहेत. सगळेच कलाकार या क्वारंटाईन दिवसात नवनवीन गोष्टी करताना दिसत आहेत. कोणी भांडी घासत आहे., कोणी वर्कआऊट करत आहे तर कोणी आपल्या कुटुंबासोबत मौल्यवान वेळ घालवत आहेत. कलाकार सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत त्यांच्या चाहत्यांचे मनोरंजन करत आहेत. यातच हिंदी चित्रटसृष्टीतील नावाजलेली व्यक्ती दिग्दर्शक- निर्माते करण जोहर मागे राहिलेला नाही.

हे ही वाचा: लाल सिंह चढ्ढा या सिनेमाचं दिग्दर्शन आमीर खान करतोय ?

करण आपला जास्तीत जास्त क्वारंटाईन वेळ हा त्याची मुलं यश आणि रुहीसोबत घालवत आहे. या क्वारंटाईन डेजमध्ये तो सतत त्याच्या मुलांसोबत सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करताना दिसतो आहे. त्यांचे हे व्हिडिओ सोशल मीडियावर बरेच व्हायरल होताना दिसत आहे. करणने नुकताच एक व्हिडिओ त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला ज्यामध्ये त्याचा मुलगा यश करणचा गाजलेला 'कुछ कुछ होता है' चित्रपटाला बोअरिंग म्हणाला आहे. या व्हिडिओमध्ये करण यशला विचारतो की, यश तू डॅडीचा 'कुछ कुछ होता है' चित्रपट पाहिलास  का? त्यावर यश म्हणाला की, 'नाही... तो चित्रपट बोअरिंग आहे.' हे उत्तर ऐकून करणलाही खूप हसू आलं.

करणने सोशल मीडियावर यश आणि रूहीबरोबरचे बरेच व्हिडिओ शेअर केले आहेत. यामधील एका व्हिडिओमध्ये यश-रुही हे दोघेही करणचे पोट पुढे असल्यावरून मस्ती करत आहेत. तर काही व्हिडिओमध्ये यश आणि रुही करणच्या ड्रेसिंग सेन्सबाबतही मस्ती करताना दिसून आले. करणने साधे कपडे घालायला हवेत, असे त्यांना वाटते. दोघेही करणला कपड्यांबाबत टिप्स देत असतात. यश आणि रुहीचे हे व्हिडिओ सोशल मीडयावर खूपच व्हायरल होत आहेत.

karan johar son yash give comment on karans kuch kuch hota hai film says boaring film


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: karan johar son yash give comment on karans kuch kuch hota hai film says boaring