
कलाकारांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यातील बऱ्या वाईट गोष्टी जाणून घेत त्यांची पोलखोल करणारा 'कॉफी विथ करण' (koffee with karan) हा कार्यक्रम गेली काही वर्षे सुरु आहे. करोनापूर्वी या कार्यक्रमाचा सहावा सिझन पार पडला होता या कार्यक्रमाचे पुढचे पर्व कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर हे पर्व लवकरच येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे.
या कार्यक्रमात बॉलीवूड मधील अनेक कलाकार करण जोहर (karan johar) सोबत गप्पा गोष्टी करतात. कॉफी आणि करण यांच्यासह या गप्पांमध्ये अनेक गॉसिप्स उलगडले जातात. मध्यंतरी हा कार्यक्रम बंद झाला असल्याची चर्चा सुरु होती. पण त्याला बगल देत आता कार्यक्रमाचे चित्रीकरण सुरु होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या कार्यक्रमाचे नियोजन आणि चित्रीकरणाआधीची पूर्वतयारी सुरु झाली आहे.
करणच्या २०२३ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (rocky aur rani ki prem kahani) या चित्रपटाचे चित्रीकरण अंतिम टप्प्यात आले असून ते मे महिन्यात संपणार आहे. तर मे महिन्याच्या शेवटी कॉफी विथ करणचे चित्रीकरण सुरु होणार आहे. हा कार्यक्रम स्टार नेटवर्कच्या वाहिनीवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. (karan johar new movie)
यंदाच्या पर्वात अक्षय कुमार, वरुण धवन, कियारा अडवाणी, अनिल कपूर, नीतू सिंग, सिद्धार्थ मल्होत्रा, रश्मिका मंदान्ना, कतरिना कैफ, सिद्धांत चतुर्वेदी यांसारखे सेलिब्रिटी यासहभागी होतील असा अंदाज वर्तवला जात आहेत. यासह रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे नवविवाहित जोडपे देखील कॉफी वतः करणच्या ७ व्या सीझनमध्ये दिसणार आहेत. सध्या सोशल मीडियावर या कार्यक्रमाची बरीच चर्चा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.