esakal | करण जोहरच्या मुलांच्या वाढदिवसाची जंगी पार्टी; तैमुरसह इतर स्टारकिड्सची हजेरी

बोलून बातमी शोधा

karan johar kids party}

यश आणि रूहीच्या वाढदिवसाचे ग्रँड सेलिब्रेशन करण्यात आले.

करण जोहरच्या मुलांच्या वाढदिवसाची जंगी पार्टी; तैमुरसह इतर स्टारकिड्सची हजेरी
sakal_logo
By
सकाळ ऑनलाइन

बॉलिवूड निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर हा त्याच्या मुलांचे फोटो आणि व्हिडीओ नेहमीच सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. 2017 मध्ये करण जोहर जुळ्या मुलांचा पिता झाला. करणने त्याच्या मुलांचे नाव त्याचे वडिल यश जोहर आणि आई रुही जोहर यांच्या नावावरून ठेवलं आहे. यश आणि रूहीचे मजा मस्तीचे व्हिडीओ करण सोशल मिडीयावर नेहमी पोस्ट करत असतो.

नुकतेच यश आणि रूहीच्या वाढदिवसाचे ग्रँड सेलिब्रेशन करण्यात आले. 7 फेब्रुवारी रोजी यश आणि रुही 7 वर्षांचे झाले. यावेळी अनेक सेलिब्रेटींनी या बर्थडे पार्टीला हजेरी लावली. या पार्टीला तुषार कपुरचा मुलगा लक्ष्य ,अबरामसोबत गौरी खान, नेहा धुपियासोबत तिची मुलगी मेहर तसेच तैमुर अली खानसोबत करिना कपूर आणि राणी मुखर्जीची मुलगी पार्टीला हजर होते. यश आणि रूही यांच्या वाढदिवसाचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. करिना कपूरने या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले होते. 

हेही वाचा : अनुष्काच्या मुलीपासून हार्दिकच्या मुलापर्यंत; जाणून घ्या स्टारकिड्सच्या नावांचा अर्थ

करणने त्यांच्या मुलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाचा व्हिडीओ पोस्ट केला होता. 'आज माझ्या आयुष्यातील सर्वांत प्रिय व्यक्तींचा वाढदिवस आहे. माझ्या फॅशनवर टीका करण्यासाठी ते नेहमीच तयार असतात', असं कॅप्शन या व्हिडीओला करणने दिले. या व्हिडीओवर अनेक सोलिब्रेटींनी कमेंट्स केल्या आहेत.