
अश्लील चित्रफितनिर्मिती आरोपप्रकरणी व्यावसायिक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली. राजच्या अटकेनंतर आडनावातील साधर्म्यामुळे अभिनेता करण कुंद्राला मनस्ताप सहन करावा लागत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत करण याविषयी व्यक्त झाला. 'जेव्हा मी माझं ट्विटर अकाऊंट उघडलं, तेव्हा अनेकांनी माझ्या नावाने ट्विट केलं होतं. पॉर्नोग्राफी प्रकरणात मला अटक झाली असं त्यांना वाटलं. नेटकरी मला टॅग करून ट्विट करत होते. काहींनी तर माझा फोटोसुद्धा वापरला. नेमकं काय घडतंय हेच समजायला मला थोडा अवधी लागला', असं करण म्हणाला. (Karan Kundrra facing frustrating experience for the same name with raj kundra slv92)
'हिंदुस्तान टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत करण पुढे म्हणाला, 'सोशल मीडियावर अनेकांनी माझ्यावर टीका केली. हे याआधीसुद्धा घडलंय. काहींनी तर आधी मीच शिल्पा शेट्टीचा पती असल्याचं गृहित धरलं होतं. पण त्यावेळी मी ते गंभीरपणे घेतलं नव्हतं. मात्र आता घडलेली घटना ही मनस्ताप देणारी आहे. एखाद्या ग्रामीण भागातल्या लोकांना किंवा ज्यांना सत्य माहित नाही, जे दररोज बातम्या वाचत-ऐकत नाहीत अशा लोकांना मीच आरोपी असल्याचं आयुष्यभर वाटेल.'
याआधी मराठी अभिनेता उमेश कामतसोबतही अशीच घटना घडली. पॉर्नोग्राफी प्रकरणात अटकेत असलेला आरोप उमेश कामतच्या जागी एका वृत्तवाहिनीने मराठी अभिनेता उमेश कामतचा फोटो दाखविला होता. याविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचं उमेशने स्पष्ट केलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.