esakal | राज कुंद्रा प्रकरणात आरोपी म्हणून वापरला अभिनेता उमेश कामतचा फोटो
sakal

बोलून बातमी शोधा

umesh kamat

राज कुंद्रा प्रकरणात आरोपी म्हणून वापरला अभिनेता उमेश कामतचा फोटो

sakal_logo
By
स्वाती वेमूल

अश्लील चित्रपट निर्मितीच्या आरोपप्रकरणी व्यावसायिक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला सोमवारी गुन्हे शाखेने अटक केली. यापूर्वी अभिनेत्री गहना वशिष्ठ आणि मध्यस्थ म्हणून काम करणाऱ्या उमेश कामतला मालमत्ता कक्षाने पॉर्नोग्राफीप्रकरणी अटक केली होती‌. यासंदर्भातील वृत्त देताना एका वृत्तवाहिनीने आरोपी उमेश कामत म्हणून मराठी अभिनेता उमेश कामतचा फोटो वापरला. याप्रकरणी अभिनेता उमेश कामतने सोशल मीडियावर पोस्ट लिहित कायदेशीर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले. (raj kundra case marathi actor umesh kamats photo used as accused slv92)

अभिनेता उमेश कामतची पोस्ट-

'आज राज कुंद्रा प्रकरणात चालवण्यात आलेल्या बातमीमध्ये, या प्रकरणातील एक आरोपी उमेश कामत याचा फोटो म्हणून माझा फोटो लावला जातो आहे. कुठलीही शहानिशा न करता वृत्तवाहिन्यांनी या प्रकरणात माझा फोटो लावून माझी बदनामी केली आहे. या प्रकारामुळे होणाऱ्या माझ्या वैयक्तिक, व्यावसायिक आणि सामाजिक हानीसाठी या वृत्तमाध्यमांना जबाबदार मानले धरले जाईल. या प्रकरणी संबंधित मी योग्य ती कायदेशीर कारवाई निश्चितच करेन.'

हेही वाचा: अटक टाळण्यासाठी राज कुंद्राकडून घेतली लाच, पोलीस अधिकाऱ्यावर गंभीर आरोप

कोण आहे आरोपी उमेश कामत?

पॉर्नोग्राफी प्रकरणात मध्यस्थ म्हणून काम करणाऱ्या उमेश कामतला मालमत्ता कक्षाने अटक केली होती‌. हॉटशॉट्स नावाच्या ॲप्लिकेशनवर कामत व्हिडीओ अपलोड करायचा. अभिनेत्री गहना वशिष्ठकडून आलेले व्हिडीओ कुठे व कसे शेअर करायचे यासाठी तो मध्यस्थ म्हणून काम पाहत होता. गहनाला एका व्हीडीओमागे 80 लाख रुपये मिळत होते. कामत हा कुंद्राशी संबंधित एका कंपनीत कामाला होता. कामतच्या अटकेनंतर त्याने चौकशीदरम्यान राज कुंद्राचे नाव घेतले होते. पण हातात ठोस पुरावे नसल्यामुळे त्यावेळी कुंद्राला अटक झाली नाही.

loading image