esakal | 'मला एकट्यात लांब कुठेतरी दफन करा'; सिद्धार्थच्या अंत्यविधीनंतर करण पटेलची पोस्ट
sakal

बोलून बातमी शोधा

karan patel

'मला एकट्यात लांब कुठेतरी दफन करा'; सिद्धार्थच्या अंत्यविधीनंतर करण पटेलची पोस्ट

sakal_logo
By
स्वाती वेमूल

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आणि ‘बिग बॉस १३’चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचे Sidharth Shukla २ सप्टेंबर रोजी निधन झाले. वयाच्या ४०व्या वर्षी सिद्धार्थने अखेरचा श्वास घेतला आहे. हृदय विकाराच्या झटक्याने सिद्धार्थने निधन झाल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर ३ सप्टेंबर रोजी सिद्धार्थच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सिद्धार्थच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर टीव्ही अभिनेता करण पटेलने Karan Patel लिहिलेली पोस्ट चर्चेत आली आहे. अंत्यविधीला उपस्थित राहिलेल्यांनी आपला खरा चेहरा दाखवला, असं म्हणत करणने राग व्यक्त केला.

करण पटेलची पोस्ट-

'मी गेल्यानंतर मला लोकांच्या नजरेपासून लांब कुठेतरी एकट्यात दफन करा. कारण आजकाल लोक अंत्यविधीलाही प्रदर्शन करणं सोडत नाहीत', अशा शब्दांत त्याने सुनावलं. तर 'आयुष्यभर मुखवटा घालून राहिले, एकाच्या निधनानंतर त्या सर्वांनी आपला खरा चेहरा दाखवला', असं त्याने दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिलंय.

हेही वाचा: Video: सिद्धार्थ शुक्लाच्या अंत्यविधीला पोहोचलेल्या संभावना सेठची पोलिसांशी बाचाबाची

सिद्धार्थच्या अंत्यविधीनंतर मुलाखत देणाऱ्या सेलिब्रिटींवर भडकली गौहर खान

सिद्धार्थच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडल्याच्या काही तासांनंतर अभिनेत्री गौहर खाननेही एक ट्विट केलं होतं. सिद्धार्थच्या कुटुंबीयांचं सांत्वन केल्यानंतर माध्यमांना मुलाखती देणाऱ्यांवर तिने राग व्यक्त केला होता. 'सिद्धार्थच्या कुटुंबीयांचं सांत्वन केल्यानंतर बाहेर येऊन माध्यमांना त्यांच्याबद्दलची माहिती देत बसू नये. माध्यमांना मुलाखती देऊन त्याच्या कुटुंबीयांच्या बाबतीत माहिती देणाऱ्यांविषयी मला वाईट वाटतं. कृपया हे थांबवा. जर तुम्ही अंत्यविधीला गेला आहात तर बाहेर येऊन 'खबरी' बनू का', अशा शब्दांत गौहरने काही सेलिब्रिटींना सुनावलं होतं.

loading image
go to top