esakal | Video: सिद्धार्थ शुक्लाच्या अंत्यविधीला पोहोचलेल्या संभावना सेठची पोलिसांशी बाचाबाची
sakal

बोलून बातमी शोधा

Video: सिद्धार्थ शुक्लाच्या अंत्यविधीला पोहोचलेल्या संभावना सेठची पोलिसांशी बाचाबाची

Video: सिद्धार्थ शुक्लाच्या अंत्यविधीला पोहोचलेल्या संभावना सेठची पोलिसांशी बाचाबाची

sakal_logo
By
स्वाती वेमूल

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या Sidharth Shukla पार्थिवावर आज (३ सप्टेंबर) दुपारी ३ वाजता मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सिद्धार्थला अंतिम निरोप देण्यासाठी चाहते आणि इंडस्ट्रीतील अनेक कलाकार स्मशानभूमीत पोहोचले होते. तिथल्या गर्दीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यातील एका व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं. या व्हिडीओत अभिनेत्री संभावना सेठ Sambhavna Seth आणि तिचा पती अविनाश द्विवेदी हे पोलिसांशी भांडताना दिसत आहेत.

संभावना सेठ आणि अविनाश द्विवेदी यांची मुंबई पोलिसांसोबत झालेली बाचाबाची या व्हिडीओत पहायला मिळतेय. यावेळी रागाच्या भरात संभावना पोलिसांवर ओरडताना दिसत आहे. लोकांची गर्दी असल्याने स्मशानभूमीच्या गेटवर सुरक्षेखातर मुंबई पोलीस उभे होते. संभावना आणि अरविंद आत जात असताना अरविंदला पोलिसांनी गेटवर रोखलं आणि त्यानंतर हा वाद सुरू झाला.

हेही वाचा: सिद्धार्थच्या निधनानंतर रश्मी देसाई का होतेय ट्रोल?

छोट्या पडद्यावरील 'बालिका वधू' या यशस्वी मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचे गुरुवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. वयाच्या अवघ्या चाळिसाव्या वर्षी सिद्धार्थसारख्या कलाकाराचा अकाली ओढवलेला मृत्यू त्याच्या चाहत्यांसह इंडस्ट्रीतील सहकलाकारांनाही चटका लावून जाणारा ठरला. अनेकांनी सोशल मीडियाद्वारे शोक व्यक्त केला.

गुरुवारी सकाळी दहानंतर सिद्धार्थला जुहू इथल्या कूपर रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता, अशी माहिती रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली. सिद्धार्थचे हृदयविकाराच्या झटक्याने झोपेतच निधन झाल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले आहे. पोलीस पंचनामा आणि शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण होण्यास लागलेला विलंब यामुळे सिद्धार्थच्या पार्थिवावर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. सिद्धार्थच्या पश्चात त्याची आई आणि दोन बहिणी असा परिवार आहे. सिद्धार्थ 'बिग बॉस'च्या तेराव्या पर्वाचा विजेता होता.

loading image
go to top