करणवीर बोहराच्या घरी चिमुकलीचं आगमन, व्हिडिओ शेअर करत दाखवली झलक

दिपाली राणे-म्हात्रे
Monday, 21 December 2020

कॅनडामधील व्हॅनकॉवर या ठिकाणी तीजयची प्रसूती झाली. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला करणवीर मुंबईहून कॅनडाला गेला होता. करणवीर आता तीन मुलींचा बाबा बनला आहे.

मुंबई- टीव्ही अभिनेता करणवीर बोहराने सोशल मिडियावर चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. तो दुस-यांदा बाबा बनला आहे. करणवीरची पत्नी तीजय सिधूने मुलीला जन्म दिला आहे. या दोघांना आधी जुळ्या मुली आहेत. बेला आणि व्हिएना अशी त्या दोघींची नावं असून आता आणखी एक कन्यारत्न त्यांना प्राप्त झालं आहे. करणवीरने व्हिडिओ शेअर करत चिमुकलीची झलक दाखवली आहे. 

हे ही वाचा: संजय दत्तने 'केजीएफ २'चं शूटींग संपवलं, सेटवरचे फोटो व्हायरल    

कॅनडामधील व्हॅनकॉवर या ठिकाणी तीजयची प्रसूती झाली. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला करणवीर मुंबईहून कॅनडाला गेला होता. करणवीर आता तीन मुलींचा बाबा बनला आहे. व्हिडिओमध्ये करणवीरच्या कुशीत चिमुकली दिसून येतेय.  तिन्ही मुलींसोबत सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत करणवीरने आनंद व्यक्त केला. 

करणवीरने लिहिलंय, ‘मला किती आनंद होतोय हे मी तुम्हाला शब्दांत सांगू शकत नाही. मी आता तीन मुलींचा पिता आहे आणि यापेक्षा सुंदर आयुष्य असूच शकत नाही. माझ्या आयुष्यातील या सर्व परींसाठी देवा तुझे खूप खूप आभार’, असं म्हणत करणवीरने तिघींचा उल्लेख लक्ष्मी, सरस्वती आणि पार्वती असा केला आहे. करणवीरच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून आणि कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय.. 'या तिन्ही देवींसोबत नेहमी खूश राहा', असं म्हणत अभिनेता जय भानुशालीने करणवीरला शुभेच्छा दिल्या.

याशिवाय गौहर खान, अश्मित पटेल, माही वीज, युविका चौधरी, श्रुती सेठ, गीता फोगाट यांनीसुद्धा करणवीर आणि तीजयला शुभेच्छा दिल्या आहेत. याआधी करणने हॉस्पिटमधील एक व्हिडिओ शेअर केला होता जो व्हायरल होत होता. करण हॉस्पिटलच्या बाहेर आनंदाने नाचताना दिसत होता. 

karanvir bohra and teejay sidhu blessed with a baby girl actor share video 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: karanvir bohra and teejay sidhu blessed with a baby girl actor share video