करणवीर बोहराने कुशल ऐवजी कुशालला केलं टॅग, अभिनेता म्हणाला 'मी अजुन जिवंत आहे'

karanveer bohra
karanveer bohra

मुंबई- टेलिव्हिजन अभिनेता कुशल पंजाबीने २७ डिसेंबर रोजी राहत्या घरात फाशी लावून आत्महत्या केली. या बातमीने संपूर्ण टेलिव्हिजन इंडस्ट्रीला धक्का बसला. अचानक झालेल्या त्याच्या मृत्युमुळे त्याचा जवळचा मित्र करणवीर बोहरा देखील दुःखी झाला. नुकतंच करणवीरने कुशलच्या नावावर एका मेंटल हेल्थ अवेअरनेससाठी पुढाकार घ्यायला सुरुवात केली आहे ज्याचं नाव त्याने एक पहल कुशल मंगल असं ठेवलं आहे. मात्र करणवीरने याची अनाऊन्समंट करताना एक मोठी चूक केली आहे. या गोष्टीमुळे तो सोशल मिडियावर ट्रोल होत आहे.   

करणवीरने सोशल मिडियावर एक ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. मात्र ही माहिती देताना त्याच्याकडून एक चूक झाली आहे. या पोस्टमध्ये त्याने कुशल पंजाबीच्या ऐवजी कुशल टंडनला टॅग केलं आहे. यामुळे करणवीर मोठ्या प्रमाणावर ट्रोल होत आहे. एवढंच नाही तर स्वतः कुशल टंडनने या पोस्टवर स्वतःची प्रतिक्रिया दिली आहे.

करणवीरने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट केलं आहे. ज्यामध्ये त्याने लिहिलंय, 'मी खूप खुश आहे की रिना जबरान आणि मी आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त नवीन उपक्रम सुरू केला आहे. मी कुशल टंडनवर खुप प्रेम केलं.' बस्स करणवीरची हिच चुक त्याचे चाहते आणि मित्रांनी पकडली आणि त्याची मस्करी करण्यास सुरुवात केली. करणवीरच्या या पोस्टवर कुशाल टंडनने कमेंट केली आहे.

कुशालने या ट्विटला रिट्विट करत लिहिलं, 'मी जिवंत आहे. गेलो नाही.' स्वतःची चूक लक्षात आल्यावर कुशालची माफी मागितली. करणवीरने पुन्हा एक ट्विट करत लिहिलं, 'सॉरी सॉरी भावा. माझ्या लिहिण्यात चुक झाली. मी तुझ्यावरही खूप प्रेम करतो हे तुला माहितीये' मात्र करणवीरच्या माफीनाम्यानंतरही त्याचं पाय खेचणं काही कमी झालं नाही. त्याचा मित्र अर्जुन बिजलानीने लिहिलं, तुझं म्हणणं होतं 'कुशल पंजाबी.' यानंतर करणवीरने त्याच्या मित्रांना म्हटलं की 'कृपया मला माफ करा. सॉरी, चुकुन झालं बाबा.

karanvir bohra wrongly tag kushal tandon instead of kushal punjabi actor said i am not dead  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com