'काश त्या अतिहुशार लोकांनी तुला...' म्हणत 'केदारनाथ'चे दिग्दर्शक अभिषेक यांनी सुशांतच्या आठवणीत केला व्हिडिओ पोस्ट

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Saturday, 12 September 2020

३ वर्षांपूर्वी  सुशांतसोबत घालवलेल्या आजच्या दिवसाची त्यांना आठवण झाली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय, काश सुशांत माहित असतं की त्याचे चाहते त्याच्यावर किती प्रेम करतात ते. 

मुंबई- सुशांत सिंह राजपूतचे चाहते केवळ भारतातंच नाही तर देशाबाहेरही आहेत. संपूर्ण जगभरात त्याचे चाहते त्याला न्याय मिळावा यासाठी प्रार्थना करत आहेत. याच दरम्यान केदारनाथचे दिग्दर्शक अभिषेक कपूर  यांनी सुशांतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ३ वर्षांपूर्वी  सुशांतसोबत घालवलेल्या आजच्या दिवसाची त्यांना आठवण झाली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय, काश सुशांत माहित असतं की त्याचे चाहते त्याच्यावर किती प्रेम करतात ते. 

हे ही वाचा: 'रामायण'मध्ये सीतेची भूमिका साकरणा-या दीपिका चिखलिया यांच्या आईचं निधन  

३ वर्षांपूर्वी आमचा एकमेकांसोबतचा शेवटचा प्रोजेक्ट केदारनाथ आजच्याच दिवशी सुरु झाला होता. भावा आपल्या एकमेकांसोबतच्या आठवणी आजही मनात ताज्या आहेत. काश तु समजु शकला असतास की तुझे चाहते तुझ्यावर किती प्रेम करतात ते. काश काही अतिहुशार डोक्याच्या माणसांनी तुला दुस-या गोष्टींवरची खात्री पटवून दिली नसती. काश तु पाहु शकला असतास की तुझे चाहते तुला न्याल मिळवून देण्यासाठी कशाप्रकारे लढत आहेत. त्यांनी तुझ्यासाठी जग उलथंपालथं घातलं आहे. आणि मला तुझा आवाज ऐकू येतोय, 'जाऊ द्या सर, काम बोलेल.'

सुशांतची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीने सुशांतवर आरोप केला होता की केदारनाथच्या सेटवर असल्यापासून ड्रग्स घेत होता. तिने असं देखील म्हटलं होतं की त्याच्यासोबत त्याचे सहकलाकार देखील ड्रग्स घेत होते. मात्र दिग्दर्शक अभिषेक कपूर यांच्या या पोस्टवरुन त्यांनी सुशांत कसा होता याची एक झलक दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.  २ मिनिट ५६ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये त्यांनी केदारनाथ सिनेमातील त्यांच्या एकमेकांसोबतच्या शूटींग दरम्यानच्या आठवणी फोटो रुपात मांडून सुशांतची वेगळी बाजू दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.   

kedarnath director abhishek kapoor post video of sushant singh rajput with emotional message  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kedarnath director abhishek kapoor post video of sushant singh rajput with emotional message