esakal | सैफ अली खानची पहिली पत्नी अमृताबद्दल करीना म्हणाली होती..
sakal

बोलून बातमी शोधा

kareena on amruta

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सैफ अली खानचं कुटुंब चर्चेत आहे. नुकताच करिना आणि सैफचा लग्नाचा वाढदिवस देखील झाला.

सैफ अली खानची पहिली पत्नी अमृताबद्दल करीना म्हणाली होती..

sakal_logo
By
दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सैफ अली खानचं कुटुंब चर्चेत आहे. नुकताच करिना आणि सैफचा लग्नाचा वाढदिवस देखील झाला. अभिनेत्री अमृता सिंग ही सैफची पहिली पत्नी आहे, तर अभिनेत्री करीना कपूर खान दुसरी. अभिनेत्री सारा अली खान आणि इब्राहिम हे दोघे अमृता सिंग यांची मुलं असून तैमूर सैफ आणि करिनाचा मुलगा आहे. शिवाय करीना पुन्हा एकदा आई होणार आहे. तैमूर, सारा आणि इब्राहीम हे तिघं माझ्या ह्रदयाजवळचे असल्याचं वक्तव्य करीनाने 'कॉफी विथ करण'च्या चॅट शोमध्ये कंलं होतं. तसंच तिने सैफ अलीखानची पहिली पत्नी अमृताबद्दल देखील आपलं मत मांडलं होतं.  मीडिया रिपोर्टनुसार करण जोहरने करीनाला आमृताबद्दल विचारलं तेव्हा करीना म्हणाली, 'त्यांची आणि माझी भेट होत नाही. मात्र मी त्यांचा खूप आदर करते. त्यांची आणि माझी भेट सारा लहान असताना झाली होती.' असं वक्तव्य तिने करणच्या शोमध्ये केलं होतं. दरम्यान, सुशांत सिंग राजपूत आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण चांगलचं गाजलं. यामध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकूल प्रीत सिंगचं देखील नाव पुढे आलं होतं. एनसीबीकडून या अभिनेत्रींची चौकशी देखील करण्यात आली होती.   

हे ही वाचा: कंगाल होण्याच्या वृत्तावर आदित्य नारायणचं स्पष्टीकरण  

kareena kapoor on amrita singh i have never met her