कंगाल होण्याच्या वृत्तावर आदित्य नारायणचं स्पष्टीकरण

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Saturday, 17 October 2020

आदित्य आणि श्वेता हे दोघेही १० वर्षांपेक्षा जास्त काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. लग्नाच्या बातमीनंतर आदित्य चांगलाच चर्चेत आला आहे. लग्नाबरोबरच चर्चा रंगत आहे ती म्हणजे त्याच्या कंगाल होण्याची.

मुंबई- प्रसिद्ध गायक आणि निवेदक आदित्य नारायणने नुकतीच त्याच्या लग्नाची घोषणा केली. आदित्य 'शापित' फेम अभिनेत्री श्वेता अग्रवालसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. आदित्य आणि श्वेता हे दोघेही १० वर्षांपेक्षा जास्त काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. लग्नाच्या बातमीनंतर आदित्य चांगलाच चर्चेत आला आहे. लग्नाबरोबरच चर्चा रंगत आहे ती म्हणजे त्याच्या कंगाल होण्याची. त्याच्या बँक अकाऊंटमध्ये केवळ १८ हजार रुपये शिल्लक असल्याच्या बातम्या पसरत होत्या. मात्र या आफवा असल्याचं सांगत त्याने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. आदित्य म्हणाला, ’लॉकडाऊनपूर्वी मी एक घर खरेदी केलंय. एक सेलिब्रिटी असून देखील मला घराच्या ईएमआय बद्दल विचार करावा लागत आहे. जर का ही महारोगराई जास्त काळ राहिली तर प्रत्येकाला नुकसानाचा सामना करावा लागण्याचं वक्तव्य त्याने केलं. शिवाय, याचा अर्थ असा होत नाही, की मी कंगाल झलो आहे. माझ्याकडे पैसा नाही. गेली दोन दशकं मी काम करत आहे. तर मी कंगाल कसा होवू शकतो? असा प्रश्न देखील त्याने याठिकाणी उपस्थित केला. एका मुलाखतीत त्याने याविषयावर स्पष्टीकरण दिलं आहे.  

हे ही वाचा: सुशांत मृत्यु प्रकरणात दिल्लीतील वकिलाला मुंबई पोलिसांनी केली अटक  

aditya narayan dismisses reports that he is bankrupt  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aditya narayan dismisses reports that he is bankrupt