करीनाला पुत्ररत्न? सैफच्या बहिणीच्या पोस्टमुळे नेटकऱ्यांमध्ये चर्चा

kareena kapoor khan
kareena kapoor khan
Updated on

अभिनेत्री करीना कपूर खानची ड्यू डेट १५ फेब्रुवारी असल्याचं सांगण्यात येत होतं. एकीकडे तिच्या डिलिव्हरीबाबतची चर्चा रंगली असताना आता सैफ अली खानच्या बहिणीची एक पोस्ट तुफान चर्चेत आली आहे. सबा पतौडीने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करत नेटकऱ्यांना प्रश्न विचारला. त्यावरून करीनाला मुलगा झाला की काय, अशी चर्चांना उधाण आलं आहे.

सबाने सैफ व त्याचा मुलगा इब्राहिम यांचा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला. 'मी तुम्हाला एक हिंट देते. माय चॅम्प्स.. मी उत्तरांची वाट पाहतेय', असं तिने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं. इब्राहिमचा लहानपणीचा फोटो पाहून करीनाला पुन्हा मुलगा झाल्याची चर्चा रंगली आहे. नेटकऱ्यांनी या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. काहींनी तर करीनाला शुभेच्छासुद्धा देण्यास सुरुवात केली आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Saba (@sabapataudi)

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात करीनाने तिच्या प्रेग्नंसीची बातमी चाहत्यांना सांगितली. नुकतंच करीनाचे वडील रणधीर कपूर यांनी एका मुलाखतीत करीनाच्या ड्यू डेटचा खुलासा केला. करीनाची ड्यु डेट १५ फेब्रुवारी असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर १६ फेब्रुवारीला सबाने फोटो पोस्ट केल्याने नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com