कंगनाच्या सुरक्षेसाठी किती पैसा खर्च होतो?

kangana ranaut
kangana ranaut

अभिनेत्री कंगना राणावतला सुरक्षा पुरवण्यासाठी किती पैसा खर्च केला जातो, याविषयीची माहिती मिळवण्यासाठी माहिती अधिकार कायद्यांतर्गत अर्ज दाखल करण्यात आला. जम्मूमधील रहिवासी रोहित चौधरी यांनी हा अर्ज दाखल केला असून त्याला गृहमंत्रालयाकडून उत्तर देण्यात आलं आहे. 'कोणत्याही व्यक्तीच्या (कंगना राणावतसह) सुरक्षेसाठी केला जाणारा खर्च आमच्याकडून संकलित केला जात नाही. त्यामुळे त्याचा नेमका आकडा आम्ही सांगू शकत नाही', असं उत्तर गृहमंत्रालयाकडून देण्यात आलं. कंगनाला गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली.

गृहमंत्रालयाचं उत्तर
"प्रवासाची साधनं, संवाद, सुरक्षारक्षकांचा पगार आणि इतर सुविधा लक्षात घेता  सुरक्षेच्या खर्चाचा नेमका आकडा सांगणं कठीण आहे. वेगवेगळ्या प्रमुखांच्या अंतर्गत येणाऱ्या विविध सुरक्षा यंत्रणांच्या बजेट प्रमुखांतर्गत खर्चाचा लेखाजोखा पार पडतो. शिवाय, राज्य सरकारदेखील सुरक्षेवर खर्च करतात. कारण प्रामुख्याने राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात दौऱ्यावर असलेल्या व्यक्तींना सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी ही राज्य सरकारांची असते. हा खर्च केंद्राकडून संकलित केला जात नाही. त्यामुळे सुरक्षेवर केल्या जाणाऱ्या खर्चाचा नेमका आकडा सांगणं कठीण आहे", असं स्पष्टीकरण गृहमंत्रालयाकडून देण्यात आलं. 

कंगनाने मुंबईसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर तिच्यातील आणि शिवसेनेतील वाद पेटला होता. मुंबईत पाऊल ठेवू नकोस अशा धमक्या अनेकांकडून आल्यानंतर त्यांना आव्हान देत ९ सप्टेंबर २०२० रोजी मुंबईला येणार असल्याचं कंगनाने स्पष्ट केलं होतं. तिच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर तिला वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली होती.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com