esakal | कोणत्याही क्षणी करीना देऊ शकते 'गुड न्यूज'; भेटवस्तूंचा वर्षाव 
sakal

बोलून बातमी शोधा

kareena kapoor

करीनाची आई बबिता कपूर, बहीण करिश्मा कपूर हे सकाळीच करीनाच्या घरी पोहोचले.

कोणत्याही क्षणी करीना देऊ शकते 'गुड न्यूज'; भेटवस्तूंचा वर्षाव 

sakal_logo
By
सकाळ ऑनलाइन

अभिनेत्री करीना कपूर खान दुसऱ्यांदा आई होणार असून कोणत्याही क्षणी तिची डिलिव्हरी होऊ शकते. करीनाची ड्यु डेट १५ फेब्रुवारी सांगण्यात येत होती आणि आता तिच्या घरी अनेकांनी भेटवस्तू पाठवण्यास सुरुवात केली आहे. सैफ अली खान आणि करीनाच्या घरी नव्या पाहुण्याच्या आगमनाची जोरदार तयारी केली जात आहे. चिमुकल्या पाहुण्याच्या आगमनाआधीच खेळणी आणि भेटवस्तू करीनाच्या घरी पोहोचल्या आहेत. 

करीनाच्या घराबाहेरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. एक व्यक्ती खेळण्यांचा मोठा बॉक्स घेऊन त्यांच्या घरी जात असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळतंय. पापाराझींनी हा व्हिडीओ शूट केला असून कशा प्रकारे तिच्या घरी तयारी सुरू आहे, हे त्यांनी त्यात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. दोन दिवसांपूर्वीच सैफची बहीण सबा पतौडी हिच्या इन्स्टाग्राम पोस्टची जोरदार चर्चा होती. सैफ आणि इब्राहिम यांचा फोटो पोस्ट करत तिने चाहत्यांना अंदाज वर्तवण्यास सांगत होती. यावरून करीनाला पुन्हा मुलगा झाला की काय, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला. 

हेही वाचा : "आम्ही दोघं"; बाळासाहेब ठाकरेंच्या नातवासोबत जोडलं जातंय अभिनेत्रीचं नाव

करीनाची आई बबिता कपूर, बहीण करिश्मा कपूर हे शुक्रवारी सकाळीच करीनाच्या घरी पोहोचले. त्यामुळे आता करीना गोड बातमी कधी देणार याची उत्सुकता चाहत्यांमध्येही आहे. करीनाने २०१२ मध्ये सैफ अली खानशी लग्नगाठ बांधली. या दोघांना चार वर्षांचा मुलगा तैमुर आहे. तैमुरचं स्टारडम एखाद्या सेलिब्रिटीइतकंच आहे. त्याचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात.