"आम्ही दोघं.."; बाळासाहेब ठाकरेंच्या नातवासोबत जोडलं जातंय अभिनेत्रीचं नाव 

स्वाती वेमूल
Thursday, 18 February 2021

दुबईमधल्या पार्टीतला व्हिडीओ झाला होता व्हायरल

अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी अलाया फर्निचरवाला हिने गेल्या वर्षी 'जवानी जानेमन' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र अलाया तिच्या चित्रपटापेक्षा खासगी आयुष्यामुळेच फार चर्चेत असते. लॉकडाउनचे नियम शिथिल करण्यात आल्यानंतर अलायाने दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नातू ऐश्वर्य ठाकरेच्या वाढदिवसाच्या पार्टीला हजेरी लावली होती. ही पार्टी दुबईत आयोजित करण्यात आली होती. या पार्टीतील फोटो व व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या दोघांच्या नात्याविषयी जोरदार चर्चा सुरु झाली. अलाया आणि ऐश्वर्य एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं. या सर्व चर्चांवर अलायाने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. 

'ई टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत अलाया म्हणाली, "तो माझा खूप चांगला मित्र आहे. मला माहितीये की हे कारण फारच रटाळ वाटेल, पण आम्ही खरंच चांगले मित्र आहोत. माझी आई आणि ऐश्वर्यची आई एकमेकांना खूप चांगल्याप्रकारे ओळखतात, माझे आजोबासुद्धा त्याच्या आईला ओळखतात. त्यामुळे बऱ्याच काळापासून आम्ही दोघं एकमेकांना ओळखतो. आता आमचे एकत्र फोटो व्हायरल झाल्यामुळे लोकांना वाटतंय की आमच्यात काहीतरी शिजतंय. आम्ही दोघांनी एकत्रच अॅक्टिंग आणि डान्स क्लासमध्ये भाग घेतला होता. जर पापाराझींनी तेव्हापासून आमचे फोटो काढले असते, तर कदाचित आमचे आणखी फोटो व्हायरल झाले असते."

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ALAYA F (@alayaf)

हेही वाचा : काय चाललंय? शहनाज गिलच्या फोनचा वॉलपेपर पाहून नेटकऱ्यांना पडला प्रश्न

फोटो व्हायरल झाल्यामुळे आता आणखी काळजी घेत असल्याचं अलायाने सांगितलं. "आम्ही कुठे एकत्र गेलो आणि तिथे फोटोग्राफर्स दिसले, तर मी नम्रपणे त्यांना फोटो काढण्यास नकार देते. कारण त्या फोटोंमुळे मी पुन्हा कुठल्या तरी चर्चांमध्ये किंवा समस्येत अडकते", असं ती पुढे म्हणाली. 

हेही वाचा : PM मोदी की राहुल गांधी ? पोल घेऊन फसला रणवीर शौरी

अलायाच्या पहिल्याच चित्रपटाच्या प्रिमिअरला ऐश्वर्यने हजेरी लावली होती. अलायानेही तिच्या २२व्या वाढदिवसाच्या पार्टीतील ऐश्वर्यसोबतचे फोटो पोस्ट केले होते. त्यामुळे या दोघांच्या रिलेशनशिपविषयी सोशल मीडियावर चर्चा होताना दिसते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Alaya F on being linked up with balasaheb thackeray grandson Aaishvary Thackeray