Happy Birthday Kareena : जाणून घ्या तिच्याविषयी काही इंटरेस्टिंग फॅक्टस्

वृत्तसंस्था
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

करीना बॉलिवूडमधील बिनधास्त अभिनेत्री आहे. करीना तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी काही लपवून ठेवत नाही.

मुंबई : अभिनेत्री करीना कपूर खानचा आज 39 वा वाढदिवस आहे. करीना बॉलिवूडमधील बिनधास्त अभिनेत्री आहे. करीना तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी काही लपवून ठेवत नाही. रिलेशनशिप, लग्न ते अगदी प्रेग्नन्सीपर्यंत सर्व गोष्टी तिने चाहत्यांसोबत नेहमीच मोकळेपणाने मांडल्या. आज तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या अशा काही रंजक गोष्टी ज्या याआधी तुम्हाला माहित नसतील.

करीनाच्या लवलाईफविषयी बोलायचं तर तिचं आणि शाहिद कपूरचं अफेअर चांगलच चर्चेत होतं. त्यानंतर ती आणि सैफ रिलेशनशिपमध्ये आले आणि लग्नबंधनात अडकले. करीनाच्या चाहत्यांना आश्चर्य वाटू शकतं पण, ती काही काळ ऋतिक रोशनला डेट करत होती. करीना आणि ऋतिक 2011 मध्ये 'कभी खुशी कभी गम' या चित्रपटादरम्यान एकत्र आले होते. त्यानंतरदेखील त्यांनी अनेक सिनेमे एकत्र केले. त्यावेळी हे कपल लग्न करणार असल्याची चर्चादेखील होती. 

त्यानंतर 2004 मध्ये 'फिदा' या चित्रपटादरम्यान शाहिद कपूर आणि करीना यांची ओळख झाली. चाहत्यांच्या फेवरेट कपलपैकी ही एक जोडी होती. मात्र काही काळानंतर त्यांचा ब्रेकअप झाला. शाहिदच्या आधी करीनाचं अभिनेता फरदीन खानसोबत सीक्रेट अफेअर होतं. शाहिदसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ती सैफच्या प्रेमात पडली. तीन वर्ष डेट केल्यानंतर त्यांनी लग्न केलं.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Happy birthday my darling bebo ! We love you Direction by @gauravvkchawla @diljitdosanjh #happybirthdaybebo #pataudidiaries

A post shared by KK (@therealkarismakapoor) on

करीनाने तिचा 39 वा वाढदिवस कुटुंबासोबत सेलिब्रेट केला. करिश्मा कपूरने बर्थडे सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यामध्ये करीना आपल्या कुटुंबासमवेत 'पतौडी पॅलेस' मध्ये केक कापताना दिसत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kareena Kapoor s Birthday Celebrations At The Pataudi Palace