Kareena Kapoor: 'एक बार हात लगाने दो' हातमिळवणी करण्यास करीनाचा नकार..अन् सोशल मिडियावर ट्रोलिंगला सुरवात...

बॉलिवूड सेलिब्रिटींना अनेकदा सार्वजनिक ठिकाणी अशा काही घटनांचा सामना करावा लागतो, ज्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्या वागणुकीची आणि स्वभावाची चर्चा होऊ लागते.
Kareena Kapoor
Kareena Kapoor sakal

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. याशिवाय करीना कपूर अनेकदा कोणत्याही कार्यक्रमात तिच्या कुटुंबासोबत दिसत असते. अनेक वेळा करीना कपूरचे व्हिडिओ आणि फोटो येताच व्हायरल होतात. पण कधी-कधी असं होतं की करीना कपूर तिच्या या वृत्तीमुळे सोशल मीडियावर ट्रोल होते.

दरम्यान, करीना कपूरचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमुळे करीना कपूर सोशल मीडियावर खूप ट्रोल होत आहे. चला तर मग जाणून घेऊया व्हिडिओमध्ये अशी कोणती गोष्ट आहे ज्यासाठी तिला ट्रोल केले जात आहे.

करीना कपूर नेहमीच तिच्या लूकमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. करीना कपूरचे नवनवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, करीना कपूरचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे.

या व्हिडिओमध्ये करीना कपूर तिच्या पतीसोबत दिसत आहे. या व्हिडिओमध्ये एक चाहती करीना जवळ येऊन तिला स्पर्श करण्याची इच्छा व्यक्त करते. “एकदा फक्त हात लावू दे”, असं ती वारंवार करीनाला म्हणते.

मात्र अभिनेत्रीचा अंगरक्षक पुढे येऊन त्या महिलेला बाजूला करतो . हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक करीना कपूरला प्रचंड ट्रोल करत आहेत. तर दुसरीकडे करीना कपूरचे चाहते अभिनेत्रीचा बचाव करताना दिसत आहेत.

Kareena Kapoor
Sharat Saxena: शरत सक्सेनाच्या फिटनेससमोर तर सलमान-अनिल देखील फिके.. फोटो व्हायरल...

करीना कपूरचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स संतापले आहेत. कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, 'तिला फक्त एकदाच हात लावायचा होता, तिलाही प्रेमाने समजावता आले असते.' तर त्याच यूजरने लिहिले की, 'अ‍ॅटिट्यूड खूप आला आहे, आजच्या अभिनेत्रीमध्ये'. याशिवाय करीना कपूरच्या अनेक चाहत्यांनी त्या महिलेला चुकीचे म्हटले आहे.

करीना कपूर आमिर खानसोबत लाल सिंह चड्ढा या शेवटच्या चित्रपटात दिसली होती. तेव्हापासून करीना कपूरचे चाहते तिच्या पुढच्या चित्रपटाची वाट पाहत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com