करिना म्हणाली, आलिया माझी वहिनी झाली तर...

वृत्तसंस्था
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

रणबीरची बहिण करिना कपूरही या दोघांच्या लग्नावर बोलली आहे. ती नेहमीच या दोघांना एकमेकांवरून चिडवत असते, पण यावेळी तिने थेट त्या दोघांच्या लग्नाच्या विषयालाच हात घातला आहे.

आलिया आणि रणबीरच्या अफेअरचे किस्से सगळीकडे पसरलेले असतानाच आता रणबीरच्या घरातील लोकही त्यांच्या लग्नाबाबत उत्साही असल्याचं कळतंय. आलिया आणि रणबीर या जोडीचे लाखो चाहते आहेत. सर्वच जण त्यांच्या लग्नाची वाट पाहात आहेत, अशातच रणबीरची बहिण करिना कपूरही या दोघांच्या लग्नावर बोलली आहे. ती नेहमीच या दोघांना एकमेकांवरून चिडवत असते, पण यावेळी तिने थेट त्या दोघांच्या लग्नाच्या विषयालाच हात घातला आहे.

काँग्रेस नेत्याच्या मुलीचे हॉट फोटो चर्चेत, तुम्ही पाहिले का?

आलिया माझी वहिनी झाली तर....
जिओ मामी फेस्टिव्हलमध्ये 'जिओ मामी मूव्ही मेला विथ स्टार 2019' या कार्यक्रमात आलिया, करिना आणि दिग्दर्शक करण जोहर उपस्थित होते. या कार्यक्रमात या तिघांची मुलाखत घेण्यात आली. या दरम्यान करिनाला रणबीर आणि आलियाच्या लग्नाविषयी प्रश्न विचारण्यात आला. 'तुम्ही आलिया रणबीरच्या लग्नाचा तो दिवस तुम्ही इमॅजीन केलाय का, जेव्हा आलिया तुमची वहिनी झाली असेल?' असा सवाल करिनाला करण्यात आला. तेव्हा तिने उत्तर दिले की, 'जर आलिया माझी वहिनी झाली, तर ती जगातली सर्वांत आनंदी मुलगी असेल.' या उत्तराने प्रेक्षक आणि आलिया सर्वच जणांनी हासून प्रतिक्रिया दिली.

दुसरीकडे आलियाला लग्नाबाबत विचारले असता ती म्हणाली की, 'लग्नाबाबत अजून विचार केला नसून अजून माझी लग्न करायची इच्छा नाही. जेव्हा वेळ येईल तेव्हा बघू.' आलिया आणि करिनाचे उत्तर ऐकून करण जोहर म्हणाला, 'जेव्हा असं होईल तेव्हा मी खूप खूश असेन आणि ओवाळणीचे ताट घेऊन उभा असेल.' यावर प्रेक्षकांमध्ये हशा पिकला.

सत्ते पे सत्ता'च्या रिमेकचं कास्टिंग झालं! कोण साकारणार अमिताभ-हेमामालिनी?

करिना आलियाची आदर्श
करिना माझी आदर्श आहे, असे आलियाने यापूर्वीच सांगितले होते. या कार्यक्रमादरम्यानही आलियाने करिनाचे खूप कौतुक केले. कुठल्याही अभिनेत्रीचे लग्न झाले की ती कारकिर्द थांबवते, पण करिनाने असे न करता आपले काम सुरूच ठेवले, असे आलियाने सांगितले. 

आलिया-रणबीरचं गुफ्तगु
आलिया आणि रणबीर आपल्या नात्याचं फारसं प्रदर्शन करताना दिसत नाहीत. त्यांनी आतापर्यंत उघडपणे आपले नाते मान्यही केले नाही. पण हे दोघं नेहमीच एकमेकांच्या कुटूंबासोबत दिसत असतात. नुकताच रणबीरचा वाढदिवस झाला, तेव्हा रणबीरचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत आलियाने त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. आगामी 'ब्रम्हास्त्र' या चित्रपटात दोघं एकत्र दिसतील.     

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

happy birthday you

A post shared by Alia (@aliaabhatt) on

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karina Kapoor speaks about Alia Bhat and Ranbir Kapoor relationship