esakal | शिल्पाच्या खुर्चीवर 'करिश्मा', राजचा 'उद्योग' भोवला
sakal

बोलून बातमी शोधा

super dance 4

शिल्पाच्या खुर्चीवर 'करिश्मा', राजचा 'उद्योग' भोवला

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडमध्ये सध्या जे काही चालंल ते सर्वांच्या चर्चेचा विषय आहे. तीन दिवसांपूर्वी अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या (shilpa shetty) पतीला पॉर्न व्हिडिओ (porn video) शुटिंग आणि ते शेयर केल्याप्रकरणात अटक करण्यात आली. यासगळ्यात सर्वाधिक मनस्ताप शिल्पाला झाला आहे. तिनं सोशल मीडियावर व्यक्त होणं थांबवलं आहे. सध्या राज पोलीस कोठडीत आहे. उद्यापर्यत त्याची पोलीस कोठडी आहे. शिल्पा शेट्टीचा सोशल मीडियावर फॅन फॉलोअर्स मोठा आहे. येत्या काही दिवसांत तिचा एक चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याशिवाय ती एका रियॅलिटी शो मध्येही सहभागी झाली होती. (karishma kapoor replaces shilpa shetty as guest judge in super dancer chapter 4 yst88)

सुपर डान्सचा शिल्पा एक महत्वाचा भाग आहे. त्यात ती परिक्षक म्हणून सहभागी झाली आहे. मात्र चर्चा अशी आहे की, तिनं त्या मालिकेच्या शुटिंगला जाणं टाळलं आहे. त्याचे कारण म्हणजे पती राज कुंद्राला झालेली अटक. तिची जागा बॉलीवूडमधल्या दुसऱ्या एका अभिनेत्रीनं घेतली आहे. तिचे नाव करिश्मा कपूर असे आहे. काही दिवसांपूर्वी शिल्पा शेट्टीनं सुपर डान्समधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. दुर्देवानं तिला तो घ्यावा लागला होता.

रियॅलिटी शो म्हणून लोकप्रिय असणारा सुपर डान्सच्या 4 सीझनच्या चित्रिकरणासाठी शिल्पा पोहचली नव्हती. त्यामुळे तिच्या नावानं चर्चा सुरु झाली. काही वेळानं असं कळलं की, ती या शो मध्ये परिक्षक म्हणून दिसणार नाही. आता शिल्पाच्या खुर्चीवर करिश्माचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावेळी करिश्माचा वेगळा अंदाज चाहत्यांना पाहायला मिळाला आहे.

हेही वाचा: मराठी अभिनेत्री सविता मालपेकरांची सोनसाखळी चोरणारा अटकेत

सध्या स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांनी करिश्मा कपूरला मानवंदना दिली आहे. करिश्मानं गेल्या काही दिवसांपूर्वी एका शो मध्ये आपल्या फिल्मी जीवनाबद्दल सांगितले होते. त्यामुळे तिच्या आठवणीनं चाहते भावनाशील झाल्याचे दिसून आले. आता करिश्माच्या एंट्रीनं पुन्हा या शो ची ताकद आणखी वाढल्याचे दिसून आले आहे.

loading image