esakal | मराठी अभिनेत्री सविता मालपेकरांची सोनसाखळी चोरणारा अटकेत
sakal

बोलून बातमी शोधा

Savita malpekar

मराठी अभिनेत्री सविता मालपेकरांची सोनसाखळी चोरणारा अटकेत

sakal_logo
By
विराज भागवत

वेळ विचारण्याच्या बहाण्याने चोरली होती सोनसाखळी

मुंबई: ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर (Savita Malpekar) यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोराणाऱ्याला (Chain Snatching) अखेर अटक करण्यात आली. दादरच्या शिवाजी पार्क पोलिसांना यश आले. आरोपीचे नाव हनिफ शेख असून तो धारावीतला रहिवासी आहे. सोमवारी रात्री नऊच्या सुमारास अभिनेत्री सविता मालपेकर यांची चेन खेचण्यात आली होती. ती चोरून तो तरूण फरार झाला होता. पुन्हा एकदा दुसऱ्या महिलेची सोनसाखळी चोरताना पोलिसांनी या चोराच्या मुसक्या आवळल्या. (Marathi Actress Savita Malpekar Chain Snatching Culprit Arrested in Dadar Shivaji Park)

हेही वाचा: अटक झाली नसती तर 'हा' होता राज कुंद्राचा पुढचा 'प्लॅन'

वेळ विचारण्याच्या बहाण्याने चोरली होती सोनसाखळी

सोमवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास सविता मालपेकर या शिवाजी पार्क येथे फेरी मारून तेथील एका कट्ट्यावर बसल्या होत्या. त्या वेळी आरोपी त्यांना वेळ विचारण्याच्या बहाण्याने जवळ आला आणि त्यांच्या गळ्यातील चेन खेचली. या झटापटीत त्यांचे कपडे फाटले. तो किरकोळ जखमही झाली. या वेळी सविता मालपेकर यांनी आरडाओरडा केला. पण, त्याआधीच आरोपी मोटारसायकलवरून पसार झाला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याची ओळखही पटली होती. त्या आधारे पोलीसांकडून आरोपीचा शोध घेतला जात होता.

हेही वाचा: "अहो संजय राऊत, निर्लज्जपणालाही मर्यादा असतात..."; भाजपची टीका

असा पकडला सोनसाखळी चोर

सविता मालपेकर यांची सोनसाखळी चोरणारा चोर पुन्हा एकदा चोरी करण्याच्या उद्देशाने आला होता. कल्पना शाह नावाच्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी करण्याचा प्रयत्न तो चोर करत होता. सोनसाखळी चोरून पळण्याचा प्रयत्न करतानाच त्याला पकडण्यात आले. दोन दिवसात शिवाजी पार्क परिसरात याच आरोपीने दुसऱ्यांदा चोरीचा प्रयत्न केला अन तो पकडला गेला.

loading image