तर करिश्मा मिसेस.अक्षय खन्नाच बनली असती..रणधीर कपूरनी होकारही दिलेला.. पण माशी कुठे शिंकली?Karsma Kapoor And AKshay Khanna Lovestory | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Karisma Kapoor And AKshaye Khanna  Lovestory

Bollywood: तर करिश्मा मिसेस.अक्षय खन्नाच बनली असती..रणधीर कपूरनी होकारही दिलेला.. पण माशी कुठे शिंकली?

Karisma Kapoor And AKshaye Khanna Lovestory: आपल्यापैकी अनेकांना हे माहित असेल की करिष्मा कपूरचं लग्न एकेकाळी अभिषेक बच्चनसोबत होणार होतं. दोघांचा साखरपुडा देखील झाला होता. पण काहितरी अंस घडलं की दोघांचा साखरपुडा तुटला अन् बच्चन आणि कपूर कुटुंबा दरम्यान सगळंच फिस्कटलं.

पण खूप कमी लोकांना माहित आहे की अभिषेक बच्चन आधी करिश्मा कपूरचं अक्षय खन्नावर प्रेम होतं. त्यांचे लग्न देखील होणार होते. ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा करिष्मा कपूर आणि अजय देवगणचं ब्रेकअप झालं होतं. पण असं काय घडलं ज्यामुळे करिष्मा आणि अक्षयच्या नात्यात दुरावा आला.

करिष्मा कपूर आणि अक्षय खन्ना यांचे नाते लग्नापर्यंत पोहोचले खरे पण नंतर ते स्वप्न पूर्ण मात्र होऊ शकलं नाही. बोललं जात की करिष्मा कपूरचे वडील रणधीर कपूर या लग्नासाठी तयार होते. अक्षय खन्नाला त्यांना आपलं जावई देखील बनवायचं होतं.

त्यामुळे ते विनोद खन्नाच्या घरी आपल्या मुलीच्या लग्नाची बोलणी करायला गेले सुद्धा होते. पण जसा विचार केला होता तसं घडलं नाही. एका व्यक्तीनं काढता पाय घातला आणि सगळंच बिनसलं.(Karisma Kapoor almost got maried to akshaye khanna read inside story)

Karisma Kapoor And AKshaye Khanna  Lovestory

Karisma Kapoor And AKshaye Khanna Lovestory

करिश्मा कपूर आणि अक्षय खन्ना ९० च्या दशकाते स्टार्स..त्यावेळी त्यांच्यात जवळीकता निर्माण झाली होती असं म्हटलं जातं. आणि हे तेव्हा घडलं जेव्हा करिश्मा आणि अजय देवगणचं ब्रेकअप झालं होतं. त्या काळात म्हणे करिश्मा खूप दुखावली होती.

त्यावेळी अक्षय खन्नानं एक मित्र म्हणून तिला आधार दिला होता. आणि हाच आधार दोघांना जवळ घेऊन आला. दोघांमध्ये अफेयर असल्याच्या बातम्या सुद्धा पसरल्या होत्या. यासाठी कारण ठरलं दोघांनी एकत्र केलेलं फोटोशूट. यामध्ये दोघांदरम्यान असलेली केमिस्ट्री सगळं काही बोलून गेली.

माहितीनुसार, रणधीर कपूर यांना देखील अक्षय खन्ना पसंत होता. अक्षय आणि करिश्माला लग्न करायचे होते..आणि यासाठी त्यांना रणधीर कपूर यांचा पाठिंबा होता. आणि म्हणूनच रणधीर कपूर यांनी विनोद खन्नांकडे यासंबंधी बोलायचं ठरवलं. पण असं काही घडणार याआधीच करिश्माची आई बबीतानं यात आडकाठी आणली.

अनेक रिपोर्ट्समधून हा दावा करण्यात आला आहे की करिश्मानं अक्षयशी लग्न करावं असं बबीता यांना वाटत नव्हतं. बबीता यांचे म्हणणे होते की त्यांची मुलगी आता करिअरच्या चांगल्या टप्प्यावर आहे आणि तिनं हे लग्न करू नये. आणि याच कारणानं अक्षय खन्ना आणि करिश्मा कपूरचं लग्नच नाही तर त्यांच्यातील नात्याचाही द एन्ड झाला.

त्यानंतर काही वर्षांनी करिश्मा कपूरचा साखरपुडा अभिषेक बच्चनसोबत झाला. गोष्ट लग्नापर्यंत पोहोचतेच आहे तोपर्यंत तिथेही गोष्टी फिसकटल्या. आणि यामागे देखील करिश्माची आई बबीता कारण होती असं बोललं गेलं.

बबीता यांना वाटत होतं आपल्या मुलीचं आयुष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहिलं पाहिजे..त्यासाठी तिनं सिनेमात काम करायला हवं. ज्यासाठी बच्चन कुटुंब तयार नव्हतं .आणि हेच कारण म्हणे करिश्मा-अभिषेकचं लग्न तुटण्यास कारणीभूत ठरलं.

पण खरं कारण हेच की आणखी दुसरं कुठलं हे अजूनही गुलदस्त्यात आहे.

तर दुसरीकडे अक्षय खन्ना आजही सिंगल आहे. जेव्हा एका मुलाखतीत अक्षयला त्याच्या लग्नाविषयी विचारले गेले होते तेव्हा तो म्हणाला होता की, तो मॅरेज मटेरियल नाहीय. तो लग्नानंतरचं लाइफ आणि कमिटमेंट या सगळ्यात फीट नाही बसत. लग्न सगळं आयुष्य बदलून टाकतं आणि म्हणूनच स्वतःच्या आयुष्याला स्वतःच कंट्रोल करायला त्याला आवडतं.