'भारतीय पुरुषांना कंडोम वापरण्याची वाटते लाज! महिलांना मात्र..', रकुलचे बोल्ड विधान | Rakul Preet Singh News | Chhatriwali Movie News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rakul Preet Singh News

Rakul Preet Singh: 'भारतीय पुरुषांना कंडोम वापरण्याची वाटते लाज! महिलांना मात्र..', रकुलचे बोल्ड विधान

Rakul Preet Singh: गेल्या वर्षी पाच वेगवेगळ्या धाटणीच्या सिनेमातून दिसलेली अभिनेत्री रकुल प्रीत सिंग बऱ्यापैकी चर्चेत राहिली. रकुलला आपल्या अभिनय कारकिर्दीत वेगवेगळ्या भूमिका साकारायच्या आहेत.

रकुलचा 'छतरीवाली' सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. सिनेमाच्या बोल्ड कथानुकामुळे रकुलचीही चर्चा झाली. या सिनेमाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतीत तिनं मनमोकळेपणानं संवाद साधला.(Rakul Preet Singh on sex education bold sentence)

'छतरीवाली' हा सिनेमा सेक्स एज्युकेशनवर भाष्य करतो. यासंदर्भात बोलताना रकुल म्हणाली,''सेक्स एज्युकेशन सारख्या विषयाला आजही आपल्याकडे फार महत्त्व दिलं जात नाही.

या विषयाचं सखोल ज्ञान लोकांना होण्यासाठी जेवढे सिनेमे काढू तेवढे कमीच आहेत आपल्या देशात आजही फक्त ५ टक्के लोक कंडोम वापरतात''.

''याचा परिणाम थेट महिलांच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे जर आपण आपल्याच घरातील आणि देशातील महिलांच्या आरोग्याची काळजी घेतली नाही तर काहीतरी चुकतंय हे प्रत्येकाला समजायला हवं''.

''यासंदर्भात जास्त लोकांना माहिती नाहीय. असं नाही कोणाला प्रोटेक्शन वापरायचं नाहीय. पण अपुऱ्या माहिती अभावी सगळं चुकत आलं आहे. महिलांना देखील याविषयाचं सखोल ज्ञान नाहीय..जे खरंतर खूप गरजेचं आहे''

. रकुलचं हे बोल्ड वक्तव्य सध्या सोशल मीडियावर खूप गाजतंय.

याच मुलाखतीत रकुल पुढे म्हणाली,'' सिनेमा म्हटलं की हिरो आणि हिरोईनं निव्वळ हाच विचार व्हायला नको. खरंतर,कोणत्याही सिनेमात जी व्यक्तिरेखा कथेला पुढे नेते तीच अधिक महत्त्वाची.

मग तो हिरो असो की हिरोईन..सध्या चांगल्या स्क्रिप्ट लिहिल्या जातायत जी सिने-इंडस्ट्रीसाठी खूप चांगली गोष्ट आहे. सगळ्यात चांगली गोष्ट आहे की प्रेक्षक आता वेगळ्या धाटणीच्या कथांचा स्विकार करत आहेत. आणि याचं उदाहरण म्हणजे आमच्या 'छतरीवाली' सिनेमाला लोकांनी दिलेला उत्तम प्रतिसाद''.

रकुल त्या मुलाखतीत पुढे म्हणाली,''माझ्यासाठी कोणत्याही सिनेमाची स्क्रीप्ट हा महत्त्वाचा भाग आहे. मी जेव्हा 'रनवे ३४' ची स्क्रिप्ट वाचली..तेव्हा ती एक वेगळीच दुनिया होती जी मला भावली. याआधी मी असं कधी पाहिलं नव्हतं.

कधी एखादा सिनेमा आपण स्विकारता कारण त्या सिनेमाच्या दिग्दर्शकासोबत तुम्हाला काम करायचे असते तर कधी तुम्ही एखादा सिनेमा स्विकारता जेव्हा तुम्हाला त्या सिनेमाच्या अभिनेत्यासोबत काम करायची इच्छा असते. कधी सिनेमातील व्यक्तिरेखा तुम्हाला आवडते..म्हणून तुम्ही सिनेमा स्विकारता''.