esakal | 'लक्ष्मीदेवीच्या नावाचा अक्षयने केला गैरवापर'; करणी सेनेकडून कायदेशीर नोटीस
sakal

बोलून बातमी शोधा

Karni Sena demands title change of Akshay Kumar starrer

श्री राजपूत करणी सेनेकडून वकील राघवेंद्र मेहरोत्र यांनी ही नोटीस पाठवली आहे. चित्रपट निर्मात्यांनी जाणूनबुजून ‘लक्ष्मी’ हे नाव शीर्षकात वापरल्याचा उल्लेख या नोटिशीत केला आहे. हिंदू धर्मातील देवदेवतांचा अपमान केल्यामुळे भावना दुखाविल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

'लक्ष्मीदेवीच्या नावाचा अक्षयने केला गैरवापर'; करणी सेनेकडून कायदेशीर नोटीस

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - अक्षय कुमारचा लक्ष्मी बॉंम्ब नावाचा चित्रपट येत्या नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. मात्र प्रदर्शनापूर्वीच त्यावरुन आता वादाला सुरुवात झाली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली होती. त्यामुळे अक्षयच्या या नव्या चित्रपटाला काही विरोधाला सामोरे जावे लागणार आहे. करणी सेनेने चित्रपटाचे नाव वादग्रस्त असल्याचे म्हटले आहे. त्यातून लक्ष्मीदेवीच्या नावाला अपमान झाल्याचे त्या संघटनेचे म्हणणे आहे.

करणी सेना अक्षयच्या नव्या चित्रपटाबाबत आक्रमक झाली  आहे. यासाठी त्यांनी अक्षयला कायदेशीर नोटीस पाठविण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी बॉलीवूडचा अभिनेता अक्षय कुमार याने एका व्हिडीओच्या माध्यमातून बॉलीवूडमधील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले होते. तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. अनेकांनी अक्षयच्या म्हणण्याला दुजोरा दिला तर अनेकांनी त्याच्यावर नाराजी व्यक्त केलीय. पुढच्या महिन्यात त्याचा ‘लक्ष्मीबॉम्ब’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. मात्र या चित्रपटाच्या प्रदर्शनाला सुशांतच्या चाहत्यांनी विरोध केला आहे. आता त्यात करणी सेनेने विरोध करण्यात महत्वाची भुमिका घेतली आहे.

श्री राजपूत करणी सेनेकडून वकील राघवेंद्र मेहरोत्र यांनी ही नोटीस पाठवली आहे. चित्रपट निर्मात्यांनी जाणूनबुजून ‘लक्ष्मी’ हे नाव शीर्षकात वापरल्याचा उल्लेख या नोटिशीत केला आहे. हिंदू धर्मातील देवदेवतांचा अपमान केल्यामुळे भावना दुखाविल्याचे त्यांचे म्हणणे आहे. लक्ष्मी देवतेच्या नावाचा अवमान त्यात झाला आहे.  असा मुख्य आरोप करणी सेनेनं केला आहे. अक्षयला पाठविण्यात आलेल्या नोटीशीमध्ये त्याने आपल्या चित्रपटाचे नाव बदलण्याची मागणी केली आहे. अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट ‘कंचना ’ या तामिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक असल्याचे म्हटले जात आहे. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे.

या चित्रपटात एका ट्रान्सजेंडर भूताने अक्षयच्या शरीराचा ताबा मिळवलेला असतो. यामध्ये अमिताभ बच्चनसुद्धा भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. राघवा लॉरेन्सने चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तसेच ओटीटी प्लॅटफॉर्म वितरकांनी या चित्रपटाचे हक्क तब्बल १२५ कोटी रुपयांना खरेदी केल्याचे म्हटले जात आहे. ९ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.  अक्षय कुमार याच्यासह कियारा अडवाणी ही या चित्रपटत दिसणार आहे. आतापर्यत तरी  ट्रेलरला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. कॉमेडी, सस्पेंन्स आणि हॉरर   प्रकारातील या चित्रपटाकडून अक्षयला खूप अपेक्षा आहेत. 

 
 

loading image
go to top