Karthik Aryan Bollywood Actor In Pune Dagdusheth Ganpati Mandir
Karthik Aryan Bollywood Actor In Pune Dagdusheth Ganpati Mandir esakal

Kartik Aaryan In Pune : कार्तिक आर्यन पुण्यातल्या दगडुशेठच्या चरणी! फोटो व्हायरल

कार्तिकच्या आगामी चित्रपटांविषयी सांगायचे झाल्यास त्याचा चंदु चॅम्पियन नावाचा चित्रपट चर्चेत आहे.

Karthik Aryan Bollywood Actor In Pune Dagdusheth Ganpati Mandir : बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यनची क्रेझ काही वेगळी आहे. त्यानं नेहमीच त्याच्या चित्रपटातून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याचा चाहतावर्ग मोठा आहे. कार्तिकच्या गेल्या काही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केल्याचे दिसून आले होते. त्याचा कियारासोबतचा सत्यप्रेम की कथा नावाचा चित्रपट चर्चेत होता.

आता कार्तिक आर्यन हा एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. तो पुण्यात आला होता. यावेळी त्यानं प्रसिद्ध श्रीमंत दगडुशेठ गणपती मंदिराचे दर्शन घेतले. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यावर नेटकऱ्यांनी आणि त्याच्या असंख्य चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. याप्रसंगी कार्तिकला पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केल्याचे दिसून आले.

‘१० ते १२ तास रिक्षा चालवून ५०० रुपये देखील सुटत नाही..'

मंदिराच्या प्रशासन समितीच्या वतीनं त्याचा सत्कारही यावेळी करण्यात आला. बॉलीवूड इंस्टंटनं इंस्टावरुन हे फोटो शेयर केले आहेत. कार्तिक आर्यननं यापूर्वी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले होते. त्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यानंतर आता तो दगडुशेठच्या दर्शनाला आल्यानं चाहत्यांमध्ये चर्चेला सुरुवात झाली आहे.

कार्तिकच्या आगामी चित्रपटांविषयी सांगायचे झाल्यास त्याचा चंदु चॅम्पियन नावाचा चित्रपट चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यावरुन सोशल मीडियामध्ये चर्चा आहे. यापूर्वी त्याचा कियारासोबत सत्यप्रेम की कथा नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यालाही बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळाल्याचे दिसून आले.

गेल्या काही वर्षांपासून कार्तिक आर्यन हा एका हिट चित्रपटाच्या शोधात आहे. त्याच्या भुलभुलैय्या २ चित्रपटानं प्रेक्षकांची निराशा केली होती. तसेच साऊथच्या अलवैकुंठपुरमच्या हिंदी रिमेकमध्ये देखील त्यानं काम केले होते. शहजादा नावानं तो चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र त्यानं चाहत्यांची निराशा केली होती.

Karthik Aryan Bollywood Actor In Pune Dagdusheth Ganpati Mandir
12 th Fail Movie Review : रक्ताचं पाणी केल्याशिवाय यश मिळणार नाही! बारावी नापास झालेला 'तो' शेवटी IPS झाला की नाही?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com