कार्तिक आर्यनने चित्रपट सोडण्याची दिली धमकी; निर्मात्यांचा आरोप | Kartik Aaryan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kartik Aryan

कार्तिक आर्यनने चित्रपट सोडण्याची दिली धमकी; निर्मात्यांचा आरोप

अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) पुन्हा एकदा त्याच्या वागणुकीमुळे चर्चेत आला आहे. निर्माते मनिष शाह यांनी कार्तिकवर 'अनप्रोफेशनल' असल्याचा आरोप केला आहे. अल्लू अर्जूनचा (Allu Arjun) 'अला वैंकुठपुरामुलो' या चित्रपटाचा डबिंग केलेला व्हर्जन थिएटरमध्ये प्रदर्शित केल्यास 'शहजादा' (Shehzada) हा चित्रपट सोडणार असल्याची धमकी दिल्याचा आरोप शाह यांनी केला आहे. 'शहजादा' हा 'अला वैंकुठपुरामुलो' याच चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. अखेर डब केलेल्या व्हर्जनचा थिएटर्समधील प्रदर्शन अखेर रद्द करण्यात आलं. अल्लू अर्जुन आणि इतर निर्मात्यांशी असलेल्या चांगल्या नात्यामुळे या प्रोजेक्टमध्ये काम करण्यास तयार झाल्याचं शाह यांनी सांगितलं.

कार्तिकने जर आता चित्रपटातून काढता पाय घेतला असता तर 'शहजादा'च्या निर्मात्यांना ४० कोटींचं नुकसान भोगावं लागलं असतं, असंही ते 'इंडिया टुडे'शी बोलताना म्हणाले. कार्तिकचं असं वागणं हे अत्यंत अयोग्य असल्याचं त्यांनी म्हटलंय. मनिष यांनी असाही दावाही केला आहे की यामुळे त्यांचं 20 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. कारण त्यांना हिंदी-डब केलेला चित्रपट हा अल्लू अर्जुनच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'पुष्पा: द राइज' या चित्रपटापेक्षा चांगली कामगिरी करणार अशी अपेक्षा होती. मी फक्त डबिंगवर दोन कोटी रुपये खर्च केले, असं त्यांनी सांगितलं.

हेही वाचा: Vamika: 'हे चुकीचं आहे', अखेर वामिकाच्या फोटोवरुन झाला वाद

भूषण कुमार आणि अमन गिल यांच्यासह अल्लू अरविंद (ज्यांनी अला वैकुंठपुरामुलोची सह-निर्मिती केली) 'शेहजादा'ची निर्मिती करत आहे. कार्तिक वादात अडकण्याची ही पहिलीच वेळ नाही. धर्मा प्रॉडक्शन्सने 'दोस्ताना २' या चित्रपटातून कार्तिकची हकालपट्टी केली होती. या चित्रपटासाठी त्याने काही काळ शूटिंगसुद्धा केली होती. धर्मा प्रॉडक्शन्सने कार्तिकला बॅन केल्याचंही म्हटलं जातं.

Web Title: Kartik Aaryan Accused Of Unprofessional Behaviour After Threatening To Walk Out Of Shehzada

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..