कार्तिक आर्यन अन् कृती सेननचा 'शहजादा' हा चित्रपट 'या' दिवशी होणार प्रदर्शित | Kartik Aaryan And Kriti Sanon | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kartik Aaryan And Kriti Sanon

कार्तिक आर्यन अन् कृती सेननचा 'शहजादा' हा चित्रपट 'या' दिवशी होणार प्रदर्शित

बाॅलीवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) सध्या भूल भुलैया २ या चित्रपटाचे यश साजरा करित आहे. एकीकडे आताही चाहते भूल भुलैयाचे कौतुक करत आहे. कार्तिकच्या सोशल मीडियावर अद्यापही चित्रपटाचा ज्वार कमी झालेले नाही. भुल भुलैया २ नंतर चाहते पुन्हा एकदा आपल्या आवडत्या अभिनेत्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत. आता त्यांची प्रतिक्षा वाढली आहे. कार्तिक आर्यन आणि कृती सेनन (Kriti Sanon) यांचा चित्रपट शहजादाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे. (Kartik Aaryan And Kriti Sanon Bollywood Movie Shehzada Release On 10 February 2023)

हेही वाचा: मनमोहन सिंगांवर टीका करणारे अनुपम खेर गप्प का, घसरत्या रुपयावर केआरकेचा सवाल

कधी होणार प्रदर्शित?

समीक्षक आणि व्यापार विश्लेषक तरण आदर्शने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तरणने शहजादाच्या प्रदर्शित होण्याची तारीख दिली आहे. तो आपल्या ट्विटमध्ये म्हणतो, कार्तिक आर्यन आणि कृती सेनन यांचा चित्रपट १० फेब्रुवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. अगोदर हा चित्रपट ४ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होणार होता. चित्रपटाचे दिग्दर्शक रोहित धवन आहेत.

हेही वाचा: अलका लांबांच्या पंतप्रधान मोदींवरील टीकेमुळे परेश रावल भडकले, म्हणाले...

हिंदीत रिमेक

वृत्तांनुसार शहजादा अल्लू अर्जुनचा चित्रपट 'अला वैकुंठपुरमलो'चा हिंदी रिमेक आहे. चित्रपटात कार्तिकबरोबर कृती सेनन महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या व्यतिरिक्त परेश रावल आणि रोनित राॅयही चित्रपट दिसणार आहे.

Web Title: Kartik Aaryan And Kriti Sanon Bollywood Movie Shehzada Release On 10 February 2023

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top