अलका लांबांच्या पंतप्रधान मोदींवरील टीकेमुळे परेश रावल भडकले, म्हणाले... | Paresh Rawal Comment On Alka Lamba | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Modi And Paresh Rawal

अलका लांबांच्या पंतप्रधान मोदींवरील टीकेमुळे परेश रावल भडकले, म्हणाले...

काँग्रेस प्रवक्ता अलका लांबा यांनी ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी एक पोस्ट शेअर केली. त्यावरुन बाॅलीवूड अभिनेता परेश रावल एकदम भडकलेच. अलका लांबा यांनी (Alka Lamba) मोदींवर (Narendra Modi) बनवलेला रिपोर्ट कार्ड मीम शेअर करत त्यांच्याविषयी अपशब्द वापरले. लांबा यांचे हे ट्विट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. ट्विटरवर लोक लांबावर टीका करित आहेत. त्या वादात परेश रावल यांनीही उडी घेतली. परेश रावल (Paresh Rawal) यांनी लांबा यांचे ट्विट शेअर करत लिहिले, जर तुम्ही अलका लांबा यांचे जन्म प्रमाणपत्र काळजीपूर्वक पाहिल्यास त्या वास्तवमध्ये मॅटर्निटी होमचे पश्चाताप पत्र आहे. (Paresh Rawal Reaction On Alka Lamba Comment On Prime Minister Narendra Modi)

हेही वाचा: आमिर खानने घेतले राजामौलींकडून खास टिप्स ! विशेष स्क्रीनिंगचे फोटो व्हायरल

अभिनेत्याच्या ट्विटवर अनेक लोकांनी गंमतीदार प्रतिक्रिया दिल्या. काहींनी खिल्लीही उडवली. अभिषेक सिंह यांनी लिहिले, काय बरोबर पंच मारला सर ! तुम्ही महान आहात. जय श्री राम ! केके शर्मा म्हणतात, हो तुम्ही बरोबर म्हणाला. कधी-कधी यांना स्वतःलाही कळत नाही की ते स्वतः काय म्हणत आहेत.

हेही वाचा: देव-देवतांची फोटो शेअर करत प्रकाश राज म्हणाले,आपण कुठे चाललो आहोत?

अनुराग लाईल लिहितात, सर ही तर असत्यावर टिकलेली सत्ता आहे, किती दिवस चालेल ? हो तुमचे काॅमेट्स अनेक वर्षांपर्यत जरुर लक्षात ठेवले जाईल. कशा प्रकारे देशाच्या नाशास प्रसिद्ध सिनेताऱ्यांनी योगदान दिले. आता हे डिलिट करु नका. तुमच्या ट्विटने वाटते की अलका लांबाजींच्या योग्य तथ्यांमुळे तुम्ही दुखवले गेले. हा तर आरसा आहे, ज्यात तुमच्या नेत्याचा चेहरा पाहून तुम्ही व्यथित झाला. तुम्ही तर कलाकार म्हणून खूपच कमाल आहात. मात्र माणूस म्हणून... असे हरेश्याम शुक्ल म्हणाले.

Web Title: Paresh Rawal Reaction On Alka Lamba Comment On Prime Minister Narendra Modi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..