अभिनेता कार्तिक आर्यनने साईन केले ३ सिनेमे, झाली एवढ्या कोटींची डिल

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Monday, 21 September 2020

गेल्या काही काळात कार्तिकने एकामागोमाग एक सोलो असे हिट सिनेमे दिल्यानंतर एक मोठी डिल त्याच्या हाताला लागली आहे. कार्तिक आर्यनने ३ सिनेमांची डील साईन केली आहे.  

मुंबई- अभिनेता कार्तिक आर्यन अजुनही चांगले सिनेमे मिळवण्यासाठी स्ट्रगल करत आहे. आता ख-या अर्थाने त्याचे चांगले दिवस आलेत असं म्हणायला हरकत नाही. कार्तिकच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. गेल्या काही काळात कार्तिकने एकामागोमाग एक सोलो असे हिट सिनेमे दिल्यानंतर एक मोठी डिल त्याच्या हाताला लागली आहे. कार्तिक आर्यनने ३ सिनेमांची डील साईन केली आहे.  

हे ही वाचा:  अनुराग कश्यपला पूर्व पत्नी आणि अभिनेत्री कल्कीचा पाठिंबा, म्हणाली 'तु महिल्यांच्या स्वातंत्र्यासाठी लढत आला आहेस..'  

पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, कार्तिकने इरोस इंटरनॅशनलसोबत ३ सिनेमांची डिल साईन केली आहे. त्यासाठी त्याला तब्बल ७५ कोटी दिले जाणार आहेत. सुरुवातीला तो एका सिनेमासाठी ६ ते ८ कोटी रुपये घ्यायचा मात्र आता तो बॉलीवूडच्या उत्तम कलाकारांपैकी एक आहे आणि एका प्रोजेक्टसाठी २५ कोटी रुपये घेत आहे. सध्या तरी या सिनेमांविषयीची अधिक माहिती आणि दिग्दर्शकांविषयीची माहिती समोर आलेली नाही. मात्र इरॉसच्या बॅनरखाली तो तीन सिनेमे करणार आहे हे मात्र नक्की. असं असलं तरी कार्तिकच्या टीमने या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही आणि इरॉस इंटरनॅनलच्या प्रवक्त्याने ही बातमी फेटाळून लावली आहे. 

कार्तिकच्या हातात अनेक मोठे प्रोजेक्ट्स आहेत मात्र कोरोनामुळे त्याची शूटींग रखडली आहे. तो धर्मा प्रोडक्शनच्या 'दोस्ताना २' मध्ये काम करतोय. याशिवाय 'भूल भूलैय्या २' आणि Ala Vaikunthapuramaloo सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये रोहित धवनसोबत काम करणार आहे. त्याच्या हातात असलेले हे सगळे प्रोजेक्ट्स पाहता तो पुढील दोन वर्ष खूप बिझी असणार आहे.   

kartik aaryan bags three film deal eros international worth rs 75 crore  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kartik aaryan bags three film deal eros international worth rs 75 crore