कार्तिक भरवतोय एक्स गर्लफ्रेंडला, रोमॅंटिक फोटो पाहाच

वृत्तसंस्था
Tuesday, 11 February 2020

सारा आणि तिच्या बॉयफ्रेंडची चर्चा खूप झालीच. पण, काही दिवसांपूर्वीच ते दोघे एकत्र नसल्याची चर्चा सुरु होती.पुन्हा एकदा कार्तिकने सारासोबत फोटो शेअर केला आहे. त्यामुळे चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.

मुंबई : सारा अली खानने काही वेळातच बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे. केदारनाथ आणि सिंबा हे दोन चित्रपट तिने केले आणि दोन्ही चित्रपट बॉक्सऑफिसवर सुपरहिट ठरले. साराचे आई वडील दोघेही सेलिब्रिटी आहेत आणि तरीही साराने स्वत:ला सिद्ध केलं आहे. सारा वैयक्तिक आयुष्यातही जॉली व्यक्ती आहे. मुलाखतींमधून तिची फन साइड नेहमीच दिसून येते. तिची फॅनफोलॉइंग दिवसेंदिवस वाढत आहे. आणि सेलिब्रिटींच्या चाहत्यांची कमीदेखील नाही. सारा आणि तिच्या बॉयफ्रेंडची चर्चा खूप झालीच. पण, काही दिवसांपूर्वीच ते दोघे एकत्र नसल्याची चर्चा सुरु होती. आता त्या दोघांचा एक रोमॅंटिक फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहे. पाहा तो फोटो आणि जाणून घ्या त्यामागची कहाणी !

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Jo Tum Na ho 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan) on

पुन्हा एकदा कार्तिकने सारासोबत फोटो शेअर केला आहे. त्यामुळे चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. सारा आणि अभिनेता कार्तिक आर्यन यांच्या लिंकअपच्या चर्चा बी-टाऊनमध्ये सुरु होत्या. कॉफी विथ करणमध्येही साराने कार्तिकला आवडण्याचा खुलासा केला होता. पण, काही दिवसांपूर्वीच या गोड कपलचा ब्रेकअप झाल्याची माहिती समोर आली. कधी डिनर डेट तर कधी वाढदिवस, दोघांना एकमेकांसोबत अनेकदा स्पॉट करण्यात आले. सोशल मीडियावरही य़ा दोघांनी एकमेकांसोबतचे क्युट फोटो शेअर केले. पण, कार्तिक आणि साराने त्यांच्या नात्याचा अधिकृतपणे कधीच खुलासा केला नाही.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Kaafi dubli ho gayi ho Aao pehle jaisi sehat banayein

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan) on

कार्तिकने शेअर केलेल्या फोटोमध्ये कार्तिक साराला स्वत: च्या हाताने जेवण खाऊ घालताना दिसत आहे. या फोटोमध्ये ते दोघं रोमॅंटिक कपलसारखे दिसत आहेत. या फोटोमुळे त्या दोघांच्या लिंकपअपच्या चर्चांना उधाण आले आहे. कार्तिकने या फोटोला मजेशीर कॅप्शन दिलं आहे. कॅप्शनमध्ये त्याने लिहिलं आहे की, ''किती बारीक झाली आहेस तु. चल, पहिल्यासारखी तब्येत करुया तुझी.''<

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#HaanMainGalat  . . Out tomorrow #LoveAajkal 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan) on

या फोटोवर चाहत्यांनी कमेटं आणि लाइक्सचा वर्षाव केला आहे. साराच्या ब्रेकअपनंतर त्याचं नाव न्यु कमर अनन्या पांडेशी जोडलं गेलं होतं. अनन्या पांडे कार्तिक हे दोघं ‘पत्नी पत्नी और वो’या चित्रपटातून एकत्र झळकले होते. पण, आता पुन्हा एकदा सारा आणि आर्य़नला एकत्र पाहून नेटकऱ्यांमध्ये उलट-सुलट चर्चा होत आहेत. सारा आणि कार्तिक नक्की डेट करत आहेत की नाही याचा खुलासा झालेला नाही. मात्र त्यांच्याा जोडीला चाहत्यांची चांगलीच पसंती आहे. 

बोल्ड ड्रेसवरुन ट्रोल करणाऱ्यांना नुसरतचं सडेतोड उत्तर

दिग्दर्शक इम्तियाज अलीचा 'लव्ह आज कल' 14 फेब्रुवारीला म्हणजेच 'व्हॅलेंटाईन डे'ला आपल्या भेटीला येतोय. सारा अली खान आणि कार्तिक आर्यन या चित्रपटात मुख्य भूमिकेत असतील. 2009मध्ये आलेला सैफ अली खान आणि दीपिका पदुकोनचा पहिला 'लव्ह आज कल' आजही प्रेक्षकांचा आवडता आहे. त्यात इम्तियाज अली पुन्हा एकदा एक रेट्रो आणि सद्यस्थितीवर भाष्य करणारी लव्हस्टोरी घेऊन येत असल्याने त्याचे चाहते खूश आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kartik Aaryan Feeds Sara Ali Khan Shares Pic