बोल्ड ड्रेसवरुन ट्रोल करणाऱ्यांना नुसरतचं सडेतोड उत्तर

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

आपल्या सुंदरतेने चाहत्यांना घायळ करणारी नुसरत हिच्यावर ट्रोलर्संनी निशाणा साधला. तिच्या बोल्ड ड्रेसमुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले.पण, या ट्रोलर्संची नुसरतने कडक शब्दात कानउघडणी केली आहे. जाणून घ्या नक्ती नुसरत काय बोलली ?

मुंबई : सेलिब्रिटींच्या फॅशनची चर्चा तर सुरुच असते. अभिनेत्री आणि अभिनेतेही त्यांच्या अतरंगी फॅशनमुळे नजरेत येतात. कधी कोण कसली फॅशन करेल याचा काही नेम नाही. नुसरत जहां हिचं नाव आता घराघरात पोहोचलं आहे. आपल्या सुंदरतेने चाहत्यांना घायळ करणारी नुसरत हिच्यावर ट्रोलर्संनी निशाणा साधला. तिच्या बोल्ड ड्रेसमुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले. ही कोणती फॅशन असा सवालही केला. पण, या ट्रोलर्संची नुसरतने कडक शब्दात कानउघडणी केली आहे. जाणून घ्या नक्ती नुसरत काय बोलली?

सुमी आणि समर करत आहेत सेलिब्रेशन, कारण आहे खास !

नुकताच रविवारी मुंबईमध्ये 'फिल्मफेअर अवॉर्ड 2020' हा पार पडला. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी आला उपस्थिती लावली. याच अवॉर्ड शोला नुसरतही आली होती. पण, तिने घातलेल्या ड्रेसने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्यावेळी नुसरतने घातेलला ड्रेस हा अतिशय बोल्ड आहे. तिने हा ड्रेस घातलेले काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. मात्र नेटकऱ्यांना तिचा हा बोल्ड लुक काही भोवला नसल्य़ाचं दिसतं. कारण,नेटकऱ्यांनी तिच्या या लुकमुळे तिला ट्रोल केलं.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान नुसरतने ट्रोलर्सना चांगलच उत्तर दिलं आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत नुसरतने ट्रोलिंगवर प्रतिक्रिया दिली आहे. नुसरत म्हणाली, ''सोशल मीडियावरील सध्याची परिस्थिती गोंधवणारी आहे. त्यावर कोणाचेच नियंत्रण नाही. प्रत्येकजण आपली मतं, आवड-निवड हे स्पष्टपणे मांडतात. प्रत्येक व्यक्तीला त्याचे मत मांडण्याचा अधिकार आहे आणि मी त्याचा आदर करते. मी कोणत्या प्रकारचे कपडे परिधान करते हे एका प्रकारचं माझं मत आहे आणि की मला हेच करायचंय आणि मी अशीच आहे. त्याचा आदर लोकांनीही केला पाहिजे.''

पुढे ती म्हणाली, "मला जे वाटतं ते मी करते. ते तुम्हाला आवडेलचं असं नाही. तुमची आवड किंवा निवड हे सर्वस्वी तुमचं वैयक्तिक मत आहे.'' अशाप्रकारची प्रतिक्रिया नुसरतने यावेळी दिली. नकारात्मक कमेंटस किंवा ट्रोल करणाऱ्या कमेंट वाचत नसल्याचं नुसरतने सांगितलं. 

कल्कीने पाऊलखुणांनी केलं छोट्या मुलीचं स्वागत, ठेवलं 'हे' अनोखं नाव !

नुसरतने घातलेला ड्रेस हा हाय स्लिटचा बोल्ड ड्रेस होता. मोरपिसी रंगाचा हा ड्रेस ऑफशोल्डर आणि एका बाजूने स्लिटचा आहे. मात्र या स्लिटमुळे संपूर्ण एक बाजू दिसते आहे. याचमुळे नुसरत ट्रोल होताना दिसतेय. एवढचं काय तिचा टॅटूही दिसतो आहे. काही सेलिब्रिटींनी तिच्या बोल्ड लुकचं कौतुक केलं आहे तर, अनेकांनी अशी कोणती फॅशन असा सवाल केला आहे. 'फॅशन डिझायनर कुठे कात्री लावतील याचा नेम नाही', 'हिचा ड्रेस पाहून देशात गरीबी आहे असं वाटतं' अशाप्रकारच्या कमेंट काही युजरने केल्या आहेत.

प्यार का पंचनामा, सोनू की टीटू की स्विटी, ड्रिमगर्ल हे काही मोजकेच पण सुपरहिट सिनेमे करुन नुसरतने बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे. सेलिब्रिटींच्या प्रत्येक गोष्टीवर लोकांची आणि पॅपराझींची नजर असते. सेलिब्रिटींचे अवॉड शोचे लुक्स, एअपरपोर्ट लुक नेहमीच व्हायरल होत असतात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nushrat Bharucha reacts to getting trolled for her red carpet outfit