Varanasi Video Viral: गंगा आरती करताना कार्तिकच्या पायात चप्पल, चाहते नाराज Kartik Aaryan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kartik Aaryan

Varanasi Video Viral: गंगा आरती करताना कार्तिकच्या पायात चप्पल, चाहते नाराज

बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यन(Kartik Aaryan) सध्या त्या 'भूलभूलैय्या २'(Bhool Bhulaiyaa) सिनेमामुळे भलताच चर्चेत आहे. या सिनेमाला मिळालेल्या यशानंतर कार्तिक देवदर्शनासाठी बनारसला(Banaras) पोहोचला होता. त्यानं दशाश्वमेध घाटावर गंगा आरतीचा देखील आनंद अनुभवला. याआधी त्यानं काशी विश्वनाथ मंदिराला भेट देऊन देवदर्शनाचा लाभ देखील घेतला. कार्तिकचा साधेपणा अन् दिसून आलेल्या देवाप्रतीच्या श्रद्धेनं चाहत्यांचं मन जिंकलं, पण तो नेमकी एक चूक करून बसला,आणि त्यामुळे चाहत्यांची नाराजगी देखील त्याच्या पदरी पडली. गंगा आरती करताना त्यानं पायात चप्पल घातलेल्या व्हिडीओमुळं कार्तिकला आता चाहत्यांनी सुनवायला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर कार्तिकनं पायात चप्पल घालून गंगा आरती केलेला व्हिडीओ(Video) जोरदार व्हायरल(Viral) होत आहे.(Kartik Aaryan fulfills his vow, reaches Kashi Vishwanath Temple in Banaras)

कार्तिक आर्यनचा 'भूलभूलैय्या २' सिनेमा बॉक्सऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. या सिनेमात कार्तिक व्यतिरिक्त कियारा अडवाणी,तब्बू,राजपाल यादव आणि अनेक दर्जेदार कलाकारांचा भरणा आहे. या सिनेमाला अनीस बझ्मीनं दिग्दर्शित केलं आहे. याआधी २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'भूलभूलैय्या' सिनेमात अक्षय कुमार,विद्या बालन,शायनी अहूजा हे मुख्य भूमिकेत होते. या सिनेमाला प्रियदर्शन यांनी दिग्दर्शित केलं होतं.

'भूलभूलैय्या २' सिनेमा २० मे रोजी प्रदर्शित झाला होता. या सिनेमासोबतच कंगनाचा 'धाकड' देखील प्रदर्शित झाला होता. पण कंगनाच्या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला नाही पण कार्तिकच्या 'भूलभूलैय्या २' ने मात्र बाजी मारली. सिनेमाला मिळालेल्या यशानंतर कार्तिकनं वाराणसीला जाऊन काशी विश्वनाथ मंदिरात देवदर्शन केलं. पण घाटावर गंगा आरती अनुभवताना मात्र तो चुकला. गंगा नदीच्या पाण्याचा मस्तकाला स्पर्श करताना त्याच्या पायात चप्पल दिसली अन् सारं चित्रच पालटलं. कार्तिकच्या मनमोकळ्या,सर्वसामान्य चाहत्यांसोबत सहज वावरण्यानं भारावलेला चाहता वर्ग अचानक त्याच्यावर भडकला.

हेही वाचा: १७ वर्ष लिव्ह-इनमध्ये अन् ५४ व्या वर्षी दिग्दर्शकाचा लग्नाचा निर्णय, का?

खरंतर, त्या व्हिडीओत आपण पाहू शकतो की नंतर कुणीतरी कार्तिकला पायातील चप्पल काढायला सांगितली तेव्हा त्यानं ती पायातून काढून मग गंगेचं पूजन केलं. चाहते आता म्हणतायत,'देवाचं दर्शन करताना पायातील चप्पल काढायची असते एवढीही समज कशी बरं नाही याला'. आणि थेट कार्तिक आर्यनवर निशाणा साधला आहे.

हेही वाचा: 'लग्नाचा विचारही मला अस्वस्थ करतो' असं का म्हणाली श्रुती हासन?

कार्तिक आर्यन आता 'शहजादा' सिनेमातून आपल्या भेटीस येत आहे. या सिनेमात त्याच्यासोबत कृती सनन आहे. याआधी 'लुकाछुपी' मध्ये ही जोडी आपण एकत्र पाहिली असेल. गेल्या काही दिवसांत करण जोहरच्या 'दोस्ताना २' मधून बाहेर काढल्यामुळे देखील कार्तिक आर्यन चर्चेत होता.

Web Title: Kartik Aaryan Fulfills His Vow Reaches Kashi Vishwanath Temple In Banaras Post Bhool Bhulaiyaa 2s

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top