
'लग्नाचा विचारही मला अस्वस्थ करतो' असं का म्हणाली श्रुती हासन?
दक्षिणेचा सुपरस्टार कमल हासन(Kamal Haasan) आणि अभिनेत्री सारिका यांची मुलगी ही ओळख घेऊन इंडस्ट्रीत आलेल्या श्रुती हासन (Shruti Haasan) आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलीवूड(Bollywood) आणि साऊथमध्ये आपली ओळख निर्मण केली. पण अचानक २०१८ मध्ये श्रुतीनं आपल्या कामातून म्हणजे अभिनयसृष्टीतून एक ब्रेक घेतला अन् ती लंडनला निघून गेली. त्या काळात तिनं लंडनमध्ये विश्रांती घेतानाच आपल्या मनाला जडलेल्या चिंता,काळजी,भीती या आजारावरही उपचार घेतले. तिनं तिथे स्वतःला आनंद देतील अशा अनेक गोष्टी केल्या. दोन वर्षात तिनं काम न करता फक्त स्वतःच्या मनातील नकारात्मकतेला पुसून काढण्यावर मेहनत घेतली.( shruti Haasan- Marriage thought makes me nervous)
हेही वाचा: 'आश्रम' च्या सेटवर प्रकाश झा यांच्यावर हल्ला; म्हणाले,'तब्बल एक तास...'
एका इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत तिनं या आपल्या आजारावर,चिंतेवर,भीतीवर बोलताना, आपल्याला आजही लग्नाच्या विचारानं देखील अस्वस्थ वाटतं असं ती स्पष्टच बोलली. यावर आई-वडिलांचा घटस्फोट कारणीभूत आहे असं वाटतं का? यावरही श्रृतीनं आपल्या मनातील विचारांना मोकळी वाट करुन दिली. चला,जाणून घेऊया नेमकं लग्न या विषयावर आणि आई-वडिलांचा घटस्फोट याविषयी काय म्हणाली श्रुती हासन?
हेही वाचा: बॉलीवूड अभिनेत्रीसोबतचं डेटिंग अन् धोका; कार्तिक आर्यननं अखेर केलं मान्य
2018 मध्ये अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेऊन गेलेली श्रुती हासन 2020 मध्ये भारतात परत आली अन् तिनं ओटीटीवर आपलं पुर्नपदार्पण केलं. 2022 हे वर्ष आपल्याला खूप आशादायी वाटत आहे असं देखील श्रुती हासन म्हणाली. तिचा वेब शो येत आहे. आणि काही हिंदी सिनेमेही आपल्याकडे आहेत असं ती म्हणाली. हिंदी सोबतच श्रुती काही दाक्षिणात्य सिनेमातही काम करत आहे. याआधी देखील श्रुती हासननं वडिल कमल हासन सारखंच स्वतःला हिंदी-साऊथ अशा दोन्ही इंडस्ट्रीत अॅक्टिव्ह ठेवलं होतं. साऊथ मध्ये ती प्रभास सोबत 'सालार' या सिनेमात दिसणार आहे. तसंच चिरंजीवीसोबत 'चिरु 154' आणि बाळकृष्ण सोबत 'NBK 107' हे सिनेमे ती साऊथमध्येच करीत आहे. तिनं दाक्षिणात्य सिनेमांना जगभरात मिळणाऱ्या प्रतिसादाविषयीही आनंद व्यक्त केला आहे.
हेही वाचा: हर्षद मेहतानंतर आता मास्टरमाइंड तेलगी वर वेबसिरीज; 'Scam 2003' चर्चेत
2009 मध्ये आपण हिंदी 'लक' सिनेमातूनच आपल्या करिअरची सुरुवात केली हे सांगताना आपल्याला बॉलीवूडमध्ये आता अधिक काम करण्याची उत्सुकता आहे असं देखील श्रुती हासन म्हणाली. हिंदी भाषेवरुन सुरु असलेल्या वादावर बोलताना श्रुती म्हणाली,''मी मुंबईत कामानिमित्तानं अनेक वर्ष घालवली आहेत. माझे आई-वडिल वेगळे झाले अ्न आई मुंबईत राहते. तर तिच्यासोबत माझं हिंदीतच बोलणं होतं. लोकं मात्र मला म्हणतात,तू साऊथ इंडियन आहे पण हिंदी चांगलं बोलतेस. पण मला वाटतं मुंबईत इतकी वर्ष घालवल्यानंतर हिंदी चांगलं यायलाच हवं''.
हेही वाचा: 'आश्रम' च्या सेटवर प्रकाश झा यांच्यावर हल्ला; म्हणाले,'तब्बल एक तास...'
लग्न कधी करणार याविषयी बोलताना मात्र श्रुती पटकन म्हणाली,''मला लग्नाच्या विचाराने देखील भिती वाटते. मी तसा विचार अद्याप केलाच नाही. मला लग्नंबंधनात सध्या अडकायचं नाही. अनेकांना वाटतं मी लग्नापासून दूर पळतेय याचं कारण माझ्या आई- वडिलांचा घटस्फोट. पण मी म्हणेन,मी जशी त्यांच्यातील भांडणं पाहिलीय,त्यांच्या विचारांत आलेला दुरावा पाहिलाय,त्यांना एकमेकांपासून दूर जाताना पाहिलंय तसंच मी त्यांनी आनंदात एकत्र घालवलेले दिवस देखील पाहिलेयत. त्यामुळे माझ्या आई-वडिलांचं नातं टिकलं नाही म्हणून मी लग्नापासून दूर पळतेय असा त्याचा अर्थ होत नाही. कारण जेव्हा त्यांच्या नात्यात सगळं ठिक होतं तेव्हा ते एक सुंदर कपल होतं आणि फक्त ते सगळं छान नातं लक्षात ठेवलं आहे''. श्रुती हासन सध्या आर्टिस्ट शांतनु हझारिका सोबत रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा आहे. 2020 पासून ते दोघे लीव्ह इन मध्ये राहत आहेत असं देखील बोललं जात आहे. ते दोघेही इन्स्टाग्रामवर आपले फोटो अधनं-मधनं शेअर करताना दिसतात.
Web Title: The Thought Of Marriage Makes Me Nervous At This Point Shruti Haasan
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..