Kartik Aaryan, Kriti Sanon's Shehzada postponed: मनोरंजन विश्वात सध्या फक्त एकाच विषयाची चर्चा सुरु आहे. तो म्हणजे शाहरुख खानच्या पठाणची... पठाण चित्रपटानं गेल्या सहा दिवसांपासून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुसाट कमाई करत आहे. अनेक रेकॉर्ड या चित्रपटाने बनवले. त्यामुळे इतर चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवरही याचा परिणाम दिसत आहे. यामुळेच कार्तिक आर्यननेही त्याच्या चित्रपटाची रिलिज डेट पुढे ढकलली आहे.
कार्तिक आर्यनचा 'शहजादा' एक आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. याबद्दल बोलताना चित्रपटाचे निर्माते अमन गिल म्हणाले, 'होय, आम्ही चित्रपटाची रिलिज पुढे ढकलली आहे. कार्तिक शाहरुख खानचा खूप आदर करतो आणि आपण सर्वजण त्याच्यावर खूप प्रेम करतो. एका आठवड्यानंतर चित्रपट आला तर आमच्यासाठीही ते चांगलं होईल, असं आम्ही ठरवले आहे.' आता 'शहजादा' 10 फेब्रुवारी ऐवजी 17 फेब्रुवारी 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
रोहित धवन दिग्दर्शित 'शहजादा' हा अल्लू अर्जुन स्टारर तेलुगू ब्लॉकबस्टर चित्रपट 'अला वैकुंठापुररामुलू'चा अधिकृत रिमेक आहे. यात कार्तिक आर्यनसह क्रिती सेनन, परेश रावल आणि मनीषा कोईराला यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, अमन गिल, एस राधा कृष्णा आणि कार्तिक आर्यन यांनी केली आहे. 14 जानेवारीला मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर कच्छमध्ये 'शेहजादा'चा ट्रेलर रिलीज करण्यात आले होते.
'शहजादा' OTT प्लॅटफॉर्म Netflix या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होऊ शकतो अशी शक्यताही वर्तवण्यात आली आहे. कार्तिक आर्यन शेवटचा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या 'फ्रेडी' चित्रपटात दिसला होता. 'शहजादा' चित्रपटाव्यतिरिक्त त्याच्याकडे 'सत्यप्रेम की कथा' यामध्ये देखील दिसणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.