वाह रे पठ्ठ्या! कार्तिकने ९ कोटींची पान मसाल्याची जाहिरात नाकारली | Kartik Aaryan News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kartik Aaryan

वाह रे पठ्ठ्या! कार्तिकने ९ कोटींची पान मसाल्याची जाहिरात नाकारली

Kartik Aaryan Refuses Offer For Pan Masala Endorsement : चित्रपटांव्यतिरिक्त बॉलिवूड कलाकार जाहिरातींमधूनही भरपूर कमाई करतात. कपड्यांपासून चप्पलांपर्यंत सर्व प्रकारच्या जाहिराती देऊन ते खिसे भरत असतात. शाहरुख, अजय देवगण आणि अक्षय कुमार या सारख्या अनेक कलाकारांनी पान-मसाला जाहिरात करून लोकांचे आरोग्य बिघडवले असा आरोप होत आहे..

दुसरीकडे कार्तिक आर्यनने (Kartik Aaryan) पान-मसाला जाहिरात नाकारली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या जाहिरातीसाठी त्याला करोडो रुपयांची ऑफर दिली जात होती, मात्र अभिनेत्याने त्याला नकार दिला आहे. त्याच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हेही वाचा: 'लालसिंग चड्ढा' कवडीमोलात विकत घेतलं नेटफ्लिक्सनं, किंमत ऐकून रडवेल आमिर

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कार्तिक आर्यनने चाहत्यांच्या आरोग्यासाठी अशी जाहिरात करण्यास नकार दिला आहे. यासाठी अभिनेत्याला ९ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. कार्तिक आर्यनने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. इतकेच नाही तर सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निगलाणी यांनीही कार्तिकच्या या भूमिकेचे कौतुक केले आहे. (Kartik Aaryan News)

हेही वाचा: बिल्किस बानोच्या समर्थनार्थ प्रकाश राज रस्त्यावर उतरले, न्याय मिळाला पाहिजे!

एवढी मोठी रक्कम मिळणार असताना नाकारणे ही सोपी बाब नाही. तरी कदाचित कार्तिक आर्यनची स्वतःचे तत्त्व असतील. या गोष्टी आजच्या नव्या कलाकारांमध्ये क्वचितच पाहायला मिळतात. पान मसाला जाहिरात नाकारून कार्तिक यूथ आयकॉन बनला आहे. (Bollywood News)

यापूर्वी अजय देवगण, अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि अक्षय कुमार यांना पान-मसालाच्या जाहिरातींसाठी नेटिझन्सच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. यासाठी अक्षय कुमारला माफीही मागावी लागली. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैय्या' हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आहे.

Web Title: Kartik Aaryan Refuses Offer For Pan Masala Endorsement 9 Crore

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..